# करंजाडेकर झूकेगा नही...... # करंजाडे पनवेल येथे भर पावसात पाण्यासाठी पाणीमोर्चा, सिडकोविरोधात करंजाडेकर आक्रमक # "पाणी पुरवठा मुबलक नाहीं तर तोंड दाखवायचे नाहीं, मूलभूत सुविधा देता येत नसतील तर शहरे विकसित कशाला करता? करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे कडाडले.... # एकवेळा नाहीं, दहा वेळा नाहीं, अनेक वेळा मोर्चा काढू जोपर्यंत पाणिप्रश्न सुटत नाहीं तोपर्यंत मोर्चा काढणारच... करंजाडेकर झूकेगा नही....... # खासदार - आमदार ठरले निष्क्रिय - विनोद साबळे आणि जनतेची संतप्त प्रतिक्रिया
# करंजाडेकर झूकेगा नही......
# करंजाडे पनवेल येथे भर पावसात पाण्यासाठी पाणीमोर्चा, सिडकोविरोधात करंजाडेकर आक्रमक
# "पाणी पुरवठा मुबलक नाहीं तर तोंड दाखवायचे नाहीं, मूलभूत सुविधा देता येत नसतील तर शहरे विकसित कशाला करता? करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे कडाडले....
# एकवेळा नाहीं, दहा वेळा नाहीं, अनेक वेळा मोर्चा काढू जोपर्यंत पाणिप्रश्न सुटत नाहीं तोपर्यंत मोर्चा काढणारच... करंजाडेकर झूकेगा नही.......
# खासदार - आमदार ठरले निष्क्रिय - विनोद साबळे आणि जनतेची संतप्त प्रतिक्रिया
पनवेल/जितेंद्र नटे
raigadmat.page
करंजाडे येथे नुकताच पाण्यासाठी जनाlआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सिडको विकसित केलेल्या या झोनमध्ये अनेक ठिकाणी अनेक सेक्टरमध्ये पाण्याची प्रचंड कमतरता आहे. उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर करत मोर्चा काढला. काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणूका असल्याने आ. बालदी यांनी सिडको भवनात करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मागील आठवड्यात सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. लोकांची दिशाभूल ते करत आहेत असे साबळे व आंग्रे सांगत आहेत.
गेली अनेक वर्षापासून येथील नागरिक अपुऱ्या पाणीपुरवतठ्यामुळे त्रस्त आहेत. जुन्या लाईन काढून नवीन लाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी पाणी साठवणूक टाकीची कमतरता आहे. येथील ग्रामपंचयात टँकर ने पाणीपुरवठा करीत असून प्रचंड मानसिक त्रास करंजाडेकराना अनुभवण्यास मिळत आहे. लाखो रुपयांचे फ्लॅट घ्यायचे आणि पाणीच नसेल तर नुसता त्रास का म्हणून सहन करायचा. सरकार याकडे कधी लक्ष देणार? नुकताच खासदारीकीचे इलेक्शन गेले आता आमदारकीचे इलेक्शन तीन महिन्यावर आले. मात्र समस्या जैसी थेंच आहे. शेवटी लोक वैतागली आणि रस्त्यावर उतरली. त्यातूनच सिडको विरोधात मोर्चा काढण्यात आला. पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने वर्षभरात करंजाडेवासियांना दीड कोटी रुपयांचे टँकरचे पाणी खरेदी करुन प्यावे लागले. यामध्ये ही घोळ आहे असे साबळे म्हणाले.
नागरिकांच्या संघटनेने मंगळवारचा दिवस मोर्चासाठी जाहीर केल्यामुळे मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता मोर्चा वसाहतीमधील सेक्टर ६ येथील बस थांब्यापासून सुरू झाला. या मोर्चेकराना जेएनपीटी महामार्ग रोखायचा होता. मात्र पोलिसांनी विरोध केल्यामुळे आणि सिडको अधिकाऱ्यांनी वसाहतीमध्येच आंदोलन ठिकाणी येऊन आश्वासन देण्याचे ठरल्याने मोर्चेकऱ्यांनी करंजाडे पोलीस ठाण्याच्या चौकी शेजारीच मोर्चा थांबवला. सिडको मंडळाचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रणिक मुळ यांनी मोर्चेकऱ्यांना जुनी जलवाहिनी यापुढे बंद ठेऊन नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा कार्यान्वित केल्याची माहिती दिली.
मोर्चाच्या शेवटी सिडकोचे अधिकारी आले. त्यांनी २० दश लक्ष लिटर पाण्याची गरज असलेल्या करंजाडेतील लोकांना यापुढे सूरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले. करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन जबरदस्त आक्रमक तसेच शांततेत नियोजन बद्ध करण्यात आले. या मोर्चाला करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशन या सोसायट्यांच्या संघटनेने पाठिंबा दिले आल्याचे या असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी 'रायगड मत'शी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment