विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, "जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन"

 


https://youtu.be/gLo0INgMrQM?si=C2lHdxxA_5Lx4LL9https://youtu.be/gLo0INgMrQM?si=C2lHdxxA_5Lx4LL9

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, "जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन"


भविष्यात आपल्या पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या स्वर्गीय दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे. या पुढील भविष्यात अशा प्रकारे विविध शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा माझा मानस आहे.- प्रितम जनार्दन म्हात्रे,

- अध्यक्ष , जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.

 पनवेल : "विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे" पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड सर,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), श्री.भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), श्री.सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युटिव्ह, एअर इंडिया मुंबई एअरपोर्ट), श्री.रुद्राश गोवारी(एअर इंडिया, गोवा एअरपोर्ट) श्री वसीम सर (फिनिक्स एअरपोर्ट ट्रेनिंग अकॅडमी) यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने जॉब कोणत्या एअरलाइन्स मध्ये आहेत, इंटरव्यू साठी जाताना कसा ड्रेस कोड पहिजे, आपले डॉक्युमेंट कशाप्रकारे असावेत, नक्की कामाचं स्वरूप काय आहे, ड्युटीची वेळ किती तास आणि कुठल्या शिफ्ट असतात, तुमच्या आत्मविश्वासावर,बोलण्याच्या कलेवरती आणि शिक्षणावर तुमचं सिलेक्शन होतं अशाप्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंग्रजीचे कोर्सेस केलात तरी सुद्धा पंधरा दिवसात बोलण्या आणि समजण्या इतपत इंग्रजी शिकू शकता असे मान्यवरांनी सांगितले.

   नवी मुंबई विमानतळ चालू झाल्यावर मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हेच आमचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचे- प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.

पनवेल - उरणच्या पासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई विमानतळाचे काम जोरदार सुरु आहे. आणि अशा ठिकाणी मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या ठिकाणी आपली माणसे, आपले स्थानिक लोकाना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत अशी रोखठोक भूमिका प्रितम म्हात्रे यांनी घेतली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार श्री बाळाराम पाटील, श्री काशिनाथ पाटील(मा.प..पं.स. सभापती), मा.श्री गोपाळ भगत,मा.नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज आणि सौ.सारिका भगत, श्री.देवा पाटील (जिल्हाध्यक्ष पु.यु.सं.रायगड), श्री बबन विश्वकर्मा हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर