# करंजाडे पाणी समस्याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी आक्रमक, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर # पाणी प्रश्न निकाली काढा अन्यथा छेडणार जन आंदोलन # पावसाली अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं # सिडकोच्या मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
# करंजाडे पाणी समस्याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी आक्रमक, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
# पाणी प्रश्न निकाली काढा अन्यथा छेडणार जन आंदोलन
# पावसाली अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं
# सिडकोच्या मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
करंजाडे / जितेंद्र नटे
@रायगड मत
सद्या पावसाळा जरी सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा अजूनही सुरुळीत नाही. जवळ जवळ दीड लाख लोकवस्ती असणाऱ्या करंजाडेला अनेक समस्या आहेत. मात्र पाणी जास्त पुरवठा होत नाही किंवा काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. इलेक्शन जरी संपले असले तरी कार्यसम्राट आमदार महेश बालदी काही अराम करण्याचे नाव घेत नाहीत. खासदार श्रीरंग बारणे यांना जिंकवण्यासाठी त्यांनी जंग जंग पच्छाडले होते. उरण मतदार संघात त्यांना अजून काम करायचे आहेत. उरणकरांचे पांग फेडण्यासाठी ते रात्रीचा दिवस करीत आहेत. म्हणूनच गुरुवार दि 13/06/24 रोजी दुपारी ठीक 2:30 वाजता माननीय आमदार श्री महेशशेठ बालदी यांनी सिडकोचे M D व पाणीपुरवठा अधिकारी श्री मूळ साहेब यांच्या सोबत करंजाडे पाणी समस्याबद्दल आक्रमक भूमिका घेऊन पाणी प्रश्न निकाली काढा अन्यता मलाच आपल्या विरोधात मोर्चा काढून पावसाळी अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं. त्यावर सिडको M D व मूळ साहेबांनी या चार दिवसात ईद हा सण झाल्यावर हायवे वरून आलेल्या लाईन वरून तुम्हाला पाण्याची सप्लाय सुरु करणार असे सांगितले. जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही व M J P च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा नवीन लाईन वरून सप्लाय चालू करण्याचे मान्य केले. तरी लवकरच करंजाड्याचे व पुनर्वसन नोड मधील रहिवाश्याना पाण्याच्या समस्यातुन कायमची मुक्ततता मिळेल. लवकरच पानिप्रश्न सुटावा याचीच वाट सद्या करंजाडेकर पाहत आहेत.
सदर मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment