# राय'गड' चे खरे शिलेदार ठरले खासदार सुनील तटकरे # लोकांच्या सुखदुःखात जाणाऱ्याला लोकांनी जिंकवले # इलेक्शन आल्यावर तोंड दाखवणाऱ्या अनंत गीते ना घरी बसवले # मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी # मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार ### 32-रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी दणदणीत विजयी

 


# राय'गड' चे खरे शिलेदार ठरले खासदार सुनील तटकरे
# लोकांच्या सुखदुःखात जाणाऱ्याला लोकांनी जिंकवले
# इलेक्शन आल्यावर तोंड दाखवणाऱ्या अनंत गीते ना घरी बसवले
# मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी
# मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार


32-रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी दणदणीत विजयी

रायगड मत / जितेंद्र नटे


2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 29 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण 10 लाख 13 हजार 272 मतांपैकी उमेदवारनिहाय  मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 425568 मते
2) श्री.सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) - 508352 मते
3) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी) - 19618 मते
4) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष) - 9394 मते
5) श्री.अमित श्रीपाल कवाडे,(अपक्ष) - 5634 मते
6) श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष) - 3515 मते
7) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) - 2560 मते
8) श्री.पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष) - 2417 मते
9) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष) - 2040 मते
10) श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी) - 1939 मते
11) श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष) - 1820 मते
12) श्री.अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष) - 1795 मते
13)श्रीमती अंजली अश्विन केळकर,(अपक्ष) - 1350 मते
14) नोटा - 27 हजार 270 मते.

शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांचा त्यांनी ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले.

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांचा त्यांनी ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मते मिळाली. तब्बल २७ हजार २७० जणांनी नोटा चे बटन दाबले. वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण मतदारांवर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांना १९ हजार ६१८ मते मिळाली. अन्य उमेदवार सपशेल अपयशी ठरले.

अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले. तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अनंत गिते आघाडीवर राहीले. अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधक्यामुळे तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ५०.१७ टक्के मते सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली

या मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु तसे झाले नाही. सुनील तटकरे यांनी सहज विजय मिळवला. तोही २०१९ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. २०१९मध्ये तटकरे यांनी अनंत गीते यांचा ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला होता. यावेळी ८२ हजार ७८४ मतंनी विजय मिळवला.

अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी पुढे सुरू राहीली. त्यामुळे विजयाचा मार्ग सोपा होत गेला.

मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार
या मतदारसंघात सुनील तटकरे व अनंत गीते यांच्यासह १३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. वंचीत बहुजन आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण निवणूक लढवत होत्या. त्यांच्यापेक्षा नोटाला जास्त मत मिळाली. २७ हजार २७० जणांनी नकाराधिकार वापरला. ११ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

नामसाधर्म्याची खेळी फेल
रायगड लोकसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे केले जातात. यावेळी ही खेळी फारशी प्रभावी ठरली नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या व्यतीरिक्त अन्य दोन अनंत गीते अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अपक्ष उमेदवार अनंत बाळूजी गीते यांना जेमतेम ३ हजार ५१५ तर अनंत पद्मा गीते यांना २ हजार ०४० मते मिळाली. त्यामुळे दोघांच्या मतांचा निकालावर कोणताही परिणाम झाला नाही.

मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी
रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी होती. या मतांचे ध्रुवीकरण करण्यात महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. खास करून अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि दापोली मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून सुनील तटकरे यांना पराभूत करण्याची रणनिती महाविकास आघाडीने आखली होती. मात्र अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघात मुस्लिम मते मिळवण्यात तटकरे यशस्वी झाले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर