राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन केले हस्तगत ; दोन आरोपी घेतले ताब्यात

 



राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन केले हस्तगत ; दोन आरोपी घेतले ताब्यात

पनवेल,  (संजय कदम) ः राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपये किंमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले. तसेच याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2, पनवेल, जि. रायगड या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. 40, तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकी होणार आहे. त्यानुसार डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान श्रीमती. आर. डी. कांबळे, श्रीमती. निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्‍वर पोटे, सचिन कदम आदींच्या पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला असता एक महिन्द्रा कंपनीची गाडी तेथे आली व या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख (25 वर्षे, रा.सायन कोळीवाडा) व परवेझ बाबुअली शेख (29 वर्षे, रा.सायन कोळीवाडा) यांच्या ताबे कब्जात पांढर्‍या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये 414 किलो अंदाजे 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. सदर आरोपी इसमांच्या कब्जातून एकुण 1,13,90,000/- किमंतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस कायदा 1985 अन्वये जप्त केला. व त्यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्या विरोधात एन.डी.पी.एस. अँक्ट कलम 8 (क),20(ब)(11),29 तसेच भा. द. स. कलम 328 अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करीत आहेत. 

फोटो ः हस्तगत केलेल्या गांजासह आरोपी



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर