# राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (RMBKS) प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पहिली वेतनवाढ # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला # कामगार वर्गात आनंद, पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
# राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (RMBKS) प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पहिली वेतनवाढ
# राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला
# कामगार वर्गात आनंद, पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
उरण @रायगड मत
उरण येथे नुकताच कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना भरघोष वेतन वाढ़ करून देण्यात आली. कामगार नेते संतोष घरत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22/05/2024 रोजी RMBKS कार्यालय जासई उरण येथे वेतन वाढ करार संपन्न झाला.
सदर करार करण्याकरीता (MICT-2) युनिट अध्यक्ष विशाल पाटील, कोषाध्यक्ष प्रणय पाटील, सह पदाधिकारी आखिलेश पाटील, रोहन पाटील, चेतन पाटील व इतर सर्व कामगारांची एकजूट लाभली.
व्यवस्थापन मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी चे मालक इरफान पटेल व जे. एम. बक्षी चे HR मॅनेजर आशिष जोशी, संतोष डुमरे हे करार करण्यासाठी उपस्थित होते.
सदर करारामध्ये रू. 5400/- ची वाढ, बेसीकमध्ये 50% रक्कम व इतर भत्त्यांमध्ये 50% आणि काळावधी 3 वर्षाकरीता करण्यात आला. विशेष म्हणजे कामगार बदली भरती सुविधा देण्यात आली. बोनस, मेडिकल, इंशोरन्स, ट्युज कोटा पुर्ण झाल्यावर एक्ट्रा ट्युज वर ओटी, रेनकोट करीता रू. 1000/- तसेच सरकारी नियमा नुसार सर्व फायदे व ईतर सुविधा देण्यात आले.
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) ने घेतलेल्या भुमिका व नेतृत्वामुले कामगारांचा झालेला पहिला वेतनवाढ करारामुळे सर्व कामगार वर्ग आनंद साजरा करीत आहे आणि कामगारांकडून संघनेच्या पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment