पॉवरलिफ्टिंग रायगड संघास राज्य 'उपविजेतेपद"
पॉवरलिफ्टिंग रायगड संघास राज्य 'उपविजेतेपद"
मुंबई / रायगड मत
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे वतीने मुंबई येथे नुकतीच 29 व 30 एप्रिल 2024 रोजी राज्य सब ज्युनिअर ज्युनिअर क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळ जवळ २२५ खेळाडूंनी (मुले व मुली)भाग घेतला होता. रायगडचे सब ज्युनिअर,ज्युनिअर मुला मुलींनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत 08 रौप्य आणि 05 कांस्य पदक अशी 13 पदके प्राप्त केली आहेत. त्याचबरोबर सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे सांघिक उपविजेतेपद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे. उपविजेतेपदाचा चषक कार्यकारणी सदस्य "संदीप कृष्णा पाटकर" यांनी पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारला. विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला. रायगडच्या या यशाबाबत *"पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड"ने* आनंद व्यक्त केला आहे. रायगडच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून यशवंत मोकल, सहाय्यक म्हणून संदीप पाटकर, सुभाष टेंबे आणि विक्रांत गायकवाड यांनी जबाबदारी पार पडली. राज्य स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.
*सब ज्युनिअर मुली*--
*१)आर्या भारती. (४३ किलो वजनी गट-रौप्य पदक, आयर्न मेट जिम खोपोली.)*२)गार्गी मसुरकर (५२ किलो वजनी गट-रौप्य पदक, आयर्न मेट जिम खोपोली.) ३) आर्या शिंदे (५७ किलो वजनी गट-रौप्य पदक, जीव्हीआर जिम कर्जत)
*ज्युनिअर मुली*--
१) दिव्या महाडिक (४३ किलो वजनी गट-
कांस्यपदक, आयर्न मेट जिम खोपोली)
२) अमृता भगत (४७किलो वजनी गट-रौप्य पदक, पॉवरहाऊस क्लब,खोपोली
३) शुभा पानीकर.(५७ किलो वजनी गट-रौप्य पदक, आयर्न मेट जिम खोपोली)
४) दिव्या शिंदे (७६
किलो वजनी गट-रौप्य पदक, आयर्न मेट जिम खोपोली)
*सब ज्युनिअर मुले-*
१) विष्णू कल्ला(५९ किलो वजनी गट-कांस्यपदक, संसारे फिटनेस पेण)
२) संस्कार सरदार (६६ किलो वजनी गट-कांस्यपदक, स्पार्टन जिम खालापूर)
*ज्युनिअर मुले-*-
१) साहिल पोरवाल (५३ किलो वजनी गट-रौप्य पदक, आयर्न मेट जिम खोपोली)
२) विनय पाटील (६६ किलो वजनी गट-कांस्यपदक, संसारे फिटनेस पेण)
३) अथर्व लोधी (८३ किलो वजनी गट- रौप्य पदक, संसारे फिटनेस पेण)
४) तन्मय पाटील (९३किलो वजनी गट-रौप्य पदक, संसारे फिटनेस पेण)
Comments
Post a Comment