पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत

 



पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत 


भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत


पनवेल / प्रतिनिधी.

       महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दिनांक ६ मे रोजी खारघर येथे भव्य सभा झाली. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी प्रथम गुलाब पुष्पांनी गुंफलेला सुंदर हार त्यांच्या गळ्यात घातला,नंतर भरजरी शाल आणि पुणेरी पगडी प्रदान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. फडणवीस साहेबांनी त्वरित पगडी परिधान करत सय्यद अकबर यांनी केलेल्या शानदार स्वागताचा स्वीकार केला. 

            त्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सय्यद अकबर म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहासात पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव मुख्यमंत्री अशी ज्यांची ख्याती आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे सत्कार- स्वागत मला करायला मिळाले हे मी माझे सौभाग्य समजतो. देशाचे खंबीर पंतप्रधान ज्यांना आज संपूर्ण जग विश्वगुरू मानत आहे असे नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही सारे मुस्लिम बांधव एकदिलाने प्रचाराचे काम करतो आहोत. आज अल्पसंख्यांक मोर्चा चा पदाधिकारी म्हणून माझ्या तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने जेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले तेव्हा उर अभिमानाने भरून आला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जाणारा विकास हा शाश्वत आणि खऱ्या अर्थाने सर्व धर्म सम भाव पाळणारा असतो. सबका साथ सबका विकास! असे म्हणत केंद्र सरकारने २०१४ साली देशाच्या विकासाला एक नवीन आयाम प्राप्त करून दिला. गेल्या दहा वर्षात या देशातील जनता भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक काम पाहते आहे. यामध्ये अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाजाला दिलेला न्याय आपण सारे जण पाहत आहोत. अल्पसंख्यांक समाजाकरता राबविलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत घेऊन जाणे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ती मी यशस्वीरित्या पार पाडणारच. म्हणूनच आज सबका साथ सबका विकास केल्यामुळेच "सबका विश्वास" देखील मोदी साहेबांच्या सोबत आहे. 

         मला ठाम विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर्वसमावेशक राजकारणाच्या माध्यमातून जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जात एक भारतीय म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुदृढ जीवनमानासाठी यापुढेही कटिबद्ध राहतील. त्यांच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम बांधवांवर जी जी जबाबदारी सोपविली जाईल ती आम्ही यशस्वी करून दाखवू.माझी तमाम मुस्लिम बांधवांना आमचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस भाई मुलतानी यांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी येत्या १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या धनुष्यबाण या निशाण समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.

        यावेळी सय्यद अकबर यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना प्रदेश सदस्य अल्पसंख्यांक मोर्चा साबीर शेख,अल्पसंख्यांक मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मन्सूर पटेल, सरचिटणीस इर्शाद शेख, मुनाफ पटेल आदी मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर