# आज कामोठेत कुस्तीच्या दंगल # 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी' भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार # एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार
# आज कामोठेत कुस्तीच्या दंगल
# 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी' भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार
# एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मा. श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल २०२४' या भव्य कुस्त्यांचे जंगी सामने अर्थात कुस्तीच्या दंगली आज शनिवार दिनांक १८ मे रोजी सायंकाळी ०४ वाजता कामोठे येथील सेक्टर ११ मधील नालंदा बुद्धविहाराच्या जवळील मैदानावर होणार आहेत.
या जंगी सामन्यांचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस आणि सचिव हिंदकेसरी पै. योगेश दोडके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी विशेष आकर्षण म्हणून नेपाळ येथील पै. देवा थापा आणि हिमाचल प्रदेश येथील पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार आहे. तसेच सामने महिला आणि पुरुष या प्रकारात आणि विविध गटात होणार असून विजेत्यांना एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कुस्ती हा खेळ आपल्या भारतात प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्राचीन काळी जत्रा, मेळावे यांचे आयोजन असताना गावोगावी कुस्त्या भरवल्या जात असत. मैदानी आणि मर्दानी असलेल्या या मातीतल्या खेळाला जागतिक स्तरावरही मानसन्मान आहे आणि आपली कुस्ती ऑलिम्पिकमध्येही खेळली जात आहे. त्यामुळे कुस्तीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याप्रमाणे हे कुस्ती सामने भव्य होण्यासाठी कामोठेतील मैदान आकर्षकपणे सजत आहे.
Comments
Post a Comment