मुख्यमंत्र्यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभा


 मुख्यमंत्र्यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभा 

मुंबई@News81 रायगड मत 

महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासाठी नुकतीच जबरदस्त सभा झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जीवंत असेपर्यंत शिवसेनेचा आवाज बुलंद होता मात्र ते गेल्यानंतर संघटनेत मतलबी वारे वाहू लागले. मात्र आता दोन वर्षात महायुती सरकारने केलेली लोकोपयोगी कामं आणि १० वर्षे मोदी सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहे, लोकं कामाला मते देतात, विकासाला मते देतात, रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्याला मते देतात. जे घरी बसून काम करतात त्यांना लोक कायमचे घरी बसवतात ही मुंबई आणि महाराष्ट्राची परंपरा आहे.


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी दिंडोशी येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आजवर केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवावे असे आवाहन याप्रसंगी स्थानिक मतदारांना केले. 

यावेळी खासदार सत्यपाल सिंह, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार अमित साटम, आमदार राजहंस सिंह, आमदार भारतीताई लव्हेकर, महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, माजी मंत्री दीपक सावंत, विभागप्रमुख स्वप्नील टेंबवलकर, भाजपचे मुरजी पटेल, युवासनेचे राहुल कनाल तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर