Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. # विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे. # मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे. # पैशाचा पडणार पाऊस
# Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
# विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार.
# एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे.
# मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे.
# पैशाचा पडणार पाऊस
रायगड मत / प्रतिनिधी
Election 2024 Update
महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय?
देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस बाकी आहेत. असं असताना Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे केवळ तीन जागा आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे.
कुणाला किती जागा?
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. टीव्ही 9 च्या ओपिनियन पोलनुसार, भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षालाही 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानालं लागण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा दावा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात येतोय.
कुणाला किती टक्के मतं?
कुणाला किती टक्के मतं मिळणार? याबाबतची टीव्ही 9 च्या ओपिनियन पोलच्या सर्व्हेमध्ये माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात एनडीएला 40.22 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 40.97 टक्के मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संभाजीनगरची जागा महायुती जिंकू शकते. धुळे लोकसभेची जागा भाजप जिंकू शकते. लातूरची जागा काँग्रेस जिंकू शकते. मुंबई उत्तर लोकसभेतून निवडणुकीच्या मैदानात असलेले पीयूष गोयल यांचाही विजय होण्याची शक्यता आहे. तर मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment