आता 6:30 वाजता करंजाडे पनवेल येथील सभा ठरणार वादग्रस्त, पाणी नाही तर मत पण नाही - करंजाडे च्या जनतेची संतप्त प्रतिक्रिया # संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली नाम साधर्म्य असणारे उमेदवार उभे करून खेळला रडीचा डाव खासदार श्रीरंग बारने घाबरले, मतदार दुरावले जातं आहेत. उरणचे आमदार आणि पनवेलचे आमदार घाबरले कारण हे आमदारकी हरू शकतात. पनवेल@News81रायगड मत
आता 6:30 वाजता करंजाडे पनवेल येथील सभा ठरणार वादग्रस्त, पाणी नाही तर मत पण नाही - करंजाडे च्या जनतेची संतप्त प्रतिक्रिया
संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली
नाम साधर्म्य असणारे उमेदवार उभे करून खेळला रडीचा डाव
खासदार श्रीरंग बारने घाबरले, मतदार दुरावले जातं आहेत. उरणचे आमदार आणि पनवेलचे आमदार घाबरले कारण हे आमदारकी हरू शकतात.
पनवेल@News81रायगड मत
महाविकास आघाडीने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदारांना घरी बसवण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने एक प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने संजोग वाघेरे पाटील मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेशी गद्दारी करून सत्ता सोपनावर झुलणाऱ्यांसोबत घरोबा करणाऱ्या विद्यमान खासदारांना संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा घाम फोडत आहे. संविधानिक मार्गाने संजोग वाघेरे पाटील यांचा पाडाव करणे जवळ जवळ अशक्य वाटू लागल्याने विद्यमान खासदाराने रडीचा डाव खेळण्यास प्रारंभ केला आहे.
३३ मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असणारे दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आमच्या सूत्रांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यमान खासदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे करण्यास भाग पाडले आहे. परंतु खोट्याच्या कपाळी नेहेमी गोटा येतो म्हणूनच यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते.
याबाबत एकंदरीत जनतेतील प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केले असता बहुतांश नागरिकांचे असे म्हणणे आहे की जर विद्यमान खासदारांनी गेल्या दोन टर्ममध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षात प्रामाणिकपणे काम करत जनसेवा केली असती तर या डमी उमेदवार रुपी कुबड्या घेण्याची गरज पडली नसती. ज्या पद्धतीने अहवालांची कागदे रंगवण्याचे काम विद्यमान खासदारांच्या कडून होत आहे ती सर्व कामे प्रामाणिकपणे केली असल्यास नाम साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची गरजच काय? असा प्रश्न देखील सामान्य जनता विचारत आहे.
संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी मिळते जुळती नावे असणारे उमेदवार शोधण्यासाठी खासदार महोदयांना थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत जावं लागलं. तर दुसरा उमेदवार रायगड जिल्ह्यातील असल्याचे समजते. नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना काही नागरिकांनी असे मत व्यक्त केले की विचारांनी विचारांना हरवण्याचे मार्ग संपले की अशाप्रकारे रडीचा डाव खेळला जातो. तूर्तास देशामध्ये हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करणारे मोदी सरकार विरुद्ध संपूर्ण देश असे चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक सामान्य जनतेची असून प्रस्थापितांना उलथावून टाकण्यासाठी मतदार मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडणार आहेत. एकंदरीतच सत्ता परिवर्तनाचे संकेत मिळू लागल्यामुळे विद्यमान खासदारांनी रडीचा डाव खेळला असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सर्वच स्तरांतून उमटत आहे. गेल्या दहा वर्षात स्वतः केलेल्या ( जी फार कमी आहेत) कामांच्या जोरावरती निवडून येणे अशक्य वाटत असल्यामुळे विद्यमान खासदारांनी साम दाम दंड भेद ही नीती वापरणे सुरू केल्याचे उपरोक्त घटनेवरून सिद्ध होते.
Comments
Post a Comment