#पत्रकाराला मारहाण म्हणजे लोकशाहीला आव्हान, सत्य बाहेर काढणाऱ्यावर हमला म्हणजे लोकशाहीवर हमला. पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री दखल कधी घेणार? खून झाल्यावर का? यामुळे गुंडाची हिम्मत वाढते. # अनधिकृत वीटभट्टीधारकाकडून पत्रकाराला मारहाण आरोपींवर गुन्हा दाखल , आरोपी अद्यापपर्यंत मोकाटच ! # श्रीवर्धन-रायगड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, पोलिसांना गुंड घाबरत नाहीत. # सोपान निंबरे पत्रकार यांच्यावरील हमल्याचे सर्व पत्रकार संघटनातर्फे निषेध! निषेध!! निषेध!!! श्रीवर्धन@News81रायगड मत
#पत्रकाराला मारहाण म्हणजे लोकशाहीला आव्हान, सत्य बाहेर काढणाऱ्यावर हमला म्हणजे लोकशाहीवर हमला. पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री दखल कधी घेणार? खून झाल्यावर का? यामुळे गुंडाची हिम्मत वाढते.
# अनधिकृत वीटभट्टीधारकाकडून पत्रकाराला मारहाण आरोपींवर गुन्हा दाखल , आरोपी अद्यापपर्यंत मोकाटच !
# श्रीवर्धन-रायगड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, पोलिसांना गुंड घाबरत नाहीत.
# सोपान निंबरे पत्रकार यांच्यावरील हमल्याचे सर्व पत्रकार संघटनातर्फे निषेध! निषेध!! निषेध!!!
श्रीवर्धन@News81रायगड मत
अनधिकृत वीटभट्टी बाबत बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात ठेवून संदीप पेंढारी, प्रथमेश बारे, प्रसाद बारे यांनी दिनांक :- २५ एप्रिल २०२४ रोजी सुमारे दुपारी साडेबाराच्या दरम्यान श्रीवर्धन शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार सोपान निंबरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत मारहाण केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे समजते की , श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गाव हद्दीत अनधिकृत वीटभट्टी चालू असल्याची माहिती घेत दोन महिन्यांपूर्वी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती याचाच राग मनात ठेवून दिनांक : - २५ एप्रिल २०२४ रोजी सोपान निंबरे यांना मारहाण करण्यात आली. सोपान निंबरे गेली अनेक वर्षे माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार म्हणून काम करत असून यातून विविध भ्रष्टाचार तसेच अनधिकृत कामे उघडकीस करून बातमी प्रसिद्ध करत असतात. अशाच कामानिमित्त ते पंचायत समिती श्रीवर्धन मध्ये आले असताना पंचायत समितीच्या परिसरामध्ये संदीप पेंढारी यांनी सोपान निंबरे यांना शिवीगाळ केली. यानंतर सोपान निंबरे कामानिमित्त महाराष्ट्र बँक बाजूला आधार कार्ड ऑनलाईन केंद्रात गेले असता आरोपी संदीप पेंढारी, प्रसाद बारे, प्रथमेश बारे या तिघांनी सोपान निंबरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शारीरिक इजा केली . सदरच्या मारहाणीत सोपान निंबरे यांच्या डाव्या हाताच्या बोटातुन रक्तश्राव सुरू झालेला होता. सोपान निंबरे यांच्या फिर्यादी वरून मारहाण करणाऱ्या संदीप पेंढारी, प्रथमेश बारे, प्रसाद बारे यांच्या विरोधात भा. द.वी. ३२४,३२३,५०४,५०६, ४२७ व ३४ अन्वये श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे करत असून आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सोपान निंबरे मागील अनेक वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत असून अद्यापपर्यंत अनेक बेकायदेशीर कृत्यांविरोधात बातम्या प्रसिद्ध करून सार्वजनिक हिताशी संबंधित विषयांवर वेगवेगळया शासकिय कार्यालयांत माहिती अधिकार अर्जाच्या माध्यमातून माहिती मिळवून सार्वजनिक करत असतात.परंतू अद्यापपर्यंत पत्रकार संरक्षण कायद्यातील कलमांनुसार प्रथम खबरी अहवालामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा नुसार संबंधित आरोपींवर कारवाई केली जाईल का असा प्रश्न स्थानिक व जिल्हास्तरीय पत्रकार व्यक्त करत असून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार ही गुन्हा दाखल करण्यासह आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांचेकडून करण्यात येत आहे.तालुक्यामध्ये जर पत्रकारच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिक किती आणि कसे सुरक्षित असतील अशी उद्विग्न प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यासह तालुक्यातील पत्रकारांसह नागरिकांकडून सदर भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार श्री.सोपान निंबरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहिर निषेध व्यक्त करत असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.
श्री.रघुनाथ कडू - रायगड जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य
Comments
Post a Comment