करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार.. संजोग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्त्याचा रात्र दिवस प्रचार # करंजाडे वसाहतीत अनेक समस्या आहेत. त्यामध्ये वसाहत तयार झाली तरी मुलांना खेळण्यासाठी गार्डन, त्याचबरोबर इतर समस्याबरोबरच मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवतो मात्र आमच्या समस्यावर कोणाचं बोलायला तयार नसतो. आमची लढाई आम्हांलाच लढायला लागते. मात्र उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी करंजाडेसाठी गेल्या दहा वर्षात कोणकोणती कामे केलीत हे सांगावे आणि मतदा्रांकडे मत मागावे असे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे हे बोलत होते

 



करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार..


संजोग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्त्याचा रात्र दिवस प्रचार 



पनवेल/प्रतिनिधी -- महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी चार पक्षांचे कार्यकर्ते यांनी पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्रभागाप्रमाणे प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येक करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य हे प्रत्येक घरात जाऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. 


माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, शेकाप शहर अध्यक्ष योगेश राणे, संदिप चव्हान, निलम भगत, मंगेश बोरकर, दिपक कूदग, संदिप नागे, केतन आंग्रे, उमेश भोईर, माधवी मॅडम, बिना शहारे, स्वप्नील सकूपाळ, किरण कांबळे श्रृती दिवेकर, प्रितम फडके, महेंद्र गायकर, रमेश आंग्रे, विजय सोनार, नसिम शेख, सुवित्ता झिंझाडे, चैतना भोईर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


पनवेल तालुक्यासह करंजाडे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करंजाडे वसाहत व गावामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरात पोहचून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची पत्रके देऊन मतदान करण्याचे आवाहनकरण्याचे काम जोरात सुरु आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात (दि.25) एप्रिल पासून झाली. महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्ष यांचे पदाधिकारी यांनी करंजाडे वसाहतीमध्ये येथील प्रचार सुरु केला. त्यावेळी महाविकास आघाडी मधील सर्व चार पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचार जोरात सुरु आहे. यावेळी मतदारांनी महायुतीचे उमेदवार कधीही येथील समस्याकडे दुर्लक्ष व केंद्रात कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे करंजाडे वासियाचा कौल वाघेरे यांना मिळेल असा विश्वास माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केले.


करंजाडेतील महायुतीच्या सभेला अल्प प्रतिसाद 


महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नुकतीच सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या सभेच्या मतदारांच्या उपस्थितीवरूनच अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असल्याचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी प्रचारादरम्यान सांगितले.


गेल्या दहा वर्षात उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कोणकोणती कामे केलीत हे करंजाडेकरांना सांगावे


करंजाडे वसाहतीत अनेक समस्या आहेत. त्यामध्ये वसाहत तयार झाली तरी मुलांना खेळण्यासाठी गार्डन, त्याचबरोबर इतर समस्याबरोबरच मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवतो मात्र आमच्या समस्यावर कोणाचं बोलायला तयार नसतो. आमची लढाई आम्हांलाच लढायला लागते. मात्र उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी करंजाडेसाठी गेल्या दहा वर्षात कोणकोणती कामे केलीत हे सांगावे आणि मतदा्रांकडे मत मागावे असे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे हे बोलत होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर