आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे
आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे
पनवेल ः आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू, असे मत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे व रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संयोजक यांना पत्र पाठवलेले आहे त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की महायुती किंवा महाविकास आघाडी जो आमच्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याचप्रमाणे आगामी विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका यामध्ये उमेदवारी मध्ये आम्हाला जो वाटा देईल त्याच पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन प्रचार करणार आहोत.
या संदर्भात चर्चा करण्याकरता त्यांनी दोन्ही महायुती व महाविकास आघाडीचे संयोजकांना पत्र पाठवलेले आहेत . त्याचप्रमाणे दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक दिवंगत मनोज संसारे यांची जयंती पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे . त्याच वेळेला रायगड रत्नागिरी मतदारसंघ व मावळ मतदारसंघात कोणाचा प्रचार करायचा याविषयी वरिष्ठांचे चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महेश साळुंखे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की मावळ व रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्यावतीने कोणाला पाठिंबा द्यायचा याचे सर्व अधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांना देण्यात आलेले आहे.
फोटो ः महेश साळुंखे
Comments
Post a Comment