रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे पनवेल तालुका पोलिसांचे आवाहन
रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे पनवेल तालुका पोलिसांचे आवाहन
पनवेल, (संजय कदम) ः रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे घेण्यात आलेल्या मशिदी ट्रस्टी व मौलाना यांच्या बैठकीत करण्यात आले.
रमजान ईद सणानिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मस्जिद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रमजान ईद सण हा शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावा., सण साजरा करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी., लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने आचारसंहितेचा अधिसूचनाचा भंग/उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला गोपनीय विभागाचे कुंवर, पंकज शिंदे यांच्यासह मशिदी ट्रस्टी व मौलाना आदी उपस्थित होते.
फोटो ः पनवेल तालुका पोलीस बैठक
Comments
Post a Comment