पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा
पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा
पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा
पनवेल (प्रतिनिधी)
रविवार दिनांक 21 "वृंदावन बाबा सभागृह,सेक्टर 5A नवीन पनवेल(पूर्व) येथे पार पडली .या स्पर्धेत अथर्व लोधी(ज्युनिअर स्ट्रोंग बॉय,संसारे फिटनेस पेण), आर्या शिंदे(सब ज्यू.स्त्राँग् गर्ल, जि व्ही आर ,कर्जत ) अमृता भगत(ज्यूनि.स्ट्रोग गर्ल, पॉवर हाऊस खोपोली),सब ज्युनि.स्पर्धेत संस्कार सरदार(स्पार्टण जिम खोपोली) हे विजेते झाले. या जिल्हा स्पर्धेत रायगड चे महाड,माणगाव,कर्जत,खोपोली,पनवेल, पेण येथील ५०चे वर खेळाडूंनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांना "गुरूद्वारा,गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्ट " ,यांचे वतीने लंगर सेवे द्वारे भोजन व्यवस्था केली होती. स्पर्धा उद्गटनास् पनवेल तालुका कुणबी समाज चे माजी अध्यक्ष रमेश फळसमकर,विद्यमान उपाध्यक्ष आणि पॉवर लिफ्टिंग रायगडचे कार्यकारणी सदस्य सुभाष टेंबे , मुंबई चे पंच अंकुश सावंत,समीर दळवी, सुरेश धुळप ,जितेंद्र यादव,पॉवरलिफ्टिग रायगड चे सचिन भालेराव,संदीप पाटकर,राहुल गजरमल आदी उपस्थित होते.स्पर्धेचे उद्घाटन अंकुश सावंत (मास्टर्स स्पर्धा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू मुंबई)यांचे हस्ते झाले.
या स्पर्धेस नवनाथ गायकर (ठाणे),गणेश तोटे(पनवेल) विक्रांत गायकवाड (खोपोली) बबन झोरे(कर्जत), कुणाल पिंगळे(खोपोली)यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेत स्पर्धेचे सांघिक विजेतेपद आयर्न मेट जिम (खोपोली) आणि उपविजेतेपद संसारे फिटनेस (पेण)यांनी मिळविले.या स्पर्धात अमोल कडूस्कर(ठाणे)राजेश शिर्के(उपनगर)गोपीनाथ पवार(मुंबई),सुनील अडसूळ(मुंबई)आदी नामवंत पंच म्हणून हजर होते.स्पर्धाच नियोजन संदीप पाटकर,सचिन भालेराव,राहुल गजरमल आणि सुभाष टेंबे यांनी उत्कृष्ट पणे केले होते.
Comments
Post a Comment