रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.
# रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.
रायगड मत / प्रतिनिधी
क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा हैदराबाद येथे "दिनांक 08 ते 12 एप्रिल 2024" या कालावधीत होईल. लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियम, बशीर बाग,नेम्पली रेल्वे स्टेशन जवळ ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत150 च्या वर पुरुष आणि 100 चे वर महिला खेळाडू सहभागी होतील असे समजते. महाराष्ट्राच्या संघात रायगडचे बबन बाबू झोरे,59 किलो वजनी गट (वाघेश्वर- कर्जत, जी व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे, 105 किलो वजनी गट (फिटनेस ऑन जिम, तक्का-पनवेल) यांची निवड झाली आहे. त्यांचे निवडीबाबत बबन झोरे यांना जीव्हीआर फिटनेस चे संचालक विनोद येवले (कर्जत)आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार ( फिटनेस ऑन जिम,संचालक, पनवेल) आणि त्यांचे प्रशिक्षक विशाल मुळे (भांडुप -मुंबई)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे वतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील असा विश्वास राष्ट्रीय पदक विजेते माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment