नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस #कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अॅड. काशिनाथ ठाकूर
नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस
कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अॅड. काशिनाथ ठाकूर
पनवेल, नवी मुंबई परिसरातील डान्सबारमध्ये चालत असलेला धांगडधिंगा हा सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभरात गाजत असल्याचे दिसत आहे. या परिसरात तर अनेक डान्सबार मध्ये रात्री उशीरापर्यंत अश्लील व समाजविघातक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आलेले असून येथील डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस सुरू असल्याचे दिसत आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 'तीन तेरा' वाजले असल्याची संतप्त प्रतिक्रीया प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संगम, मूड, सेल्फी, बेला, सावली, अक्षय, बेवाच, मनिष, ब्लुस्टार, धनराज, बाबा पॅलेस, मॅग्नेट, सैराट, एस. बी. बार या डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुली दिसून आलेल्या आहेत. बांग्लादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या या बांग्लादेशीय मुली भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भारतीय नागरिकत्वाची बोगस कागदपत्रे मिळवून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
या बांग्लादेशीयांमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला असून त्यांच्याकडून अनुचित प्रकार, अथवा देशविरोधी कारवाया घडल्यास त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment