# सुनील तटकरे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील; आमदार गोगावले यांचा विश्‍वास # मतदार तटकरेंच्या विकासकामांपाठीशी




 # सुनील तटकरे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील; आमदार गोगावले यांचा विश्‍वास

# मतदार तटकरेंच्या विकासकामांपाठीशी 


माणगाव/रायगड मत प्रतिनिधी :

रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास शिवसेना उपनेते तथा विधी मंडळ पक्षप्रतोद माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथे बोलताना व्यक्त केला.

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रचार कार्यालय माणगावमधील जुने बसस्थानक येथे सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भरत गोगावले म्हणाले की, येणाऱ्या ७ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचे प्रचार कार्यालय ठिकठिकाणी सुरू होणार असून पहिले प्रचार कार्यालय मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात सुरू होत आहे. चार पक्षांचे हे कार्यालय असून या ठिकाणाहून बैठका, सभा, प्रचार रॅली यांचे नियोजन कार्यकर्त्यांना करण्यात येईल. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने कार्यालयात येऊन प्रचाराचे नियोजन करावे.

आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. ही निवडणूक महत्त्वाची असून कोणीही गाफील राहू नका, असा सल्लाही यावेळी गोगावले यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला. मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचार कार्यालयाच्या उद्‍घाटनाला असलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष केकाणे, दक्षिण रायगड शिवसेना संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, भाजपचे ज्‍येष्ठ नेते संजय आप्पा ढवळे, प्रदेश भाजप महिला मोर्चा सचिव यशोधरा गोडबोले, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख महेंद्र मानकर, माजी सभापती संगीता बक्कम, माजी सभापती प्रकाश लाड, माजी उपसभापती तुकाराम सुतार, भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष नीलेश थोरे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर