उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी महाराष्ट्राची राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ सन्मान

 


उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी महाराष्ट्राची राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ सन्मान


पनवेल, दिपाली पारसकर.

पुणे येथील शिवाजीनगर जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या ठिकाणी एस एस सिनेव्हिजन व आझाद फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ' *तेजस्विनी महाराष्ट्राची* ' या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. एस एस सिनेव्हीजन व आझाद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात कला, क्रीडा, शिक्षण, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, उद्योग, आरोग्य, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येतो. जेणेकरून त्यांचा उत्साह वाढवा आणि इतरांनाही त्यातून आदर्श घेता यावा तसेच पुढे काम करण्यासाठी अधिक उत्साह वाढावा या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार *चित्रपट निर्माता लेखक दिग्दर्शक सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद* यांच्या संकल्पनेतून आयोजित केला जातो. यावर्षी तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील १६० महिलांचा सन्मान करण्यात आला. *यामध्ये पनवेल मधील सामाजिक कार्यकर्त्या किरण आढागळे, सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला पाबरेकर, उद्योजिका सुषमा पोतदार, युथ महाराष्ट्र संपादिका दिपाली पारसकर यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.* यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपिल पोलीस उपसंचालक (पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई), एसीपी संजय पाटील, सुपरहिट चित्रपट आणि टीव्ही सिरीयल चे दिग्दर्शक अर्शद खान, क्रिएटिव्ह व रियालिटी शोज चे दिग्दर्शक सलीम शेख, प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हुमायू कबीर, सा रे ग म फेम गायिका निरुपमा डे, अभिनेत्री सिद्धी कामत, भारत सरकारच्या राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय धावपटू इब्राहिम अरेभावी, रोजगार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टॅलेंट कॉर्प सोलुशन चे संचालक डॉक्टर मेहबूब सय्यद , आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाइम्स ऑफ पुणे चे सतीश राठोड यांनी केले हा पुरस्कार मिळाल्यामुळे पनवेल मधील या सन्मानमूर्ती महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर