आगामी लोकसभा व सण उत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने श्रीवर्धन शहरातून पोलिसांचा रूट मार्च




आगामी लोकसभा व सण उत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने श्रीवर्धन शहरातून पोलिसांचा रूट मार्च*


श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी / राजू रिकामे

 लोकसभा निवडणुक, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी  सण उत्सवा निमीत्त श्रीवर्धन तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवार दि.१० श्रीवर्धन शहरातून श्रीवर्धन पोलिसांनी रुट मार्च काढला होता.                

  पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक मुघळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी याकरिता तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती रुट मार्च दरम्यान पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी दिली. 

                                               

 श्रीवर्धन तालुक्यामध्ये सर्वच सण आणि उत्सव हे गुण्या गोविंदाने तसेच शांततेत पार पडतात. श्रीवर्धन मधील जनता ही सर्वधर्मसमभाव मानणारे व एकोपा जोपासणारी अशी आहे. सर्व नागरिकांनी अशाच प्रकारे एकोपा जोपासावा आणि शांतते सर्व सण उत्सव साजरे करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी केले. तसेच सर्व नागरिकांनी राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे असे देखील पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे हे म्हणाले.      

                                                                                                              लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, मोगल मोहल्ला, झिंगर मोहल्ला, जामा मस्जिद, बागवान मस्जिद, डॉ. कासिम राऊत चौक, पोस्ट ऑफिस पर्यंत रूट मार्च काढण्यात आला तसेच श्रीवर्धन पोलिस ठाणे येथे दंगा नियंत्रनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर