श्रीवर्धनच्या इंडिया आघाडी च्या जनसंवाद मेळाव्यात अनंत गीते यांचा तटकरेंवर घणाघात. मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना मी हद्दपार करणार होतो . - अनंत गीते
श्रीवर्धनच्या इंडिया आघाडी च्या जनसंवाद मेळाव्यात अनंत गीते यांचा तटकरेंवर घणाघात. मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना मी हद्दपार करणार होतो . - अनंत गीते
श्रीवर्धन / रायगड मत
मागच्याच निवडणुकित २०१९ ला या सुनिल तटकरेना या रायगड च्या राजकारणातून मी हद्दपार करणार होते . शंभर टक्के हद्दपार करणार होतो परंतू त्यांची हद्दपारी वाचवविली कुणी ? त्यांची हद्दपारी शेकापच्या जयंतभाई पाटलांनी वाचविली आणि हे हद्दपारी करण्याच पाप जयंत भाईनी केले म्हणून त्यांनी जयंतभाई पाटलांच्याच पाटीत खंजीर खुपसला . फक्त त्यांनी जयंत भाईंच्या पाटीत खंजीर खुपसला नव्हे तर ज्यांनी राजकारणात जन्म दिला त्या बॅ ए आर अंतुले साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला . त्यानंतर ज्या शरद पवार साहेबांनी मोठ केलं त्या शरद पवार साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला . आता नंबर कुणाचा आहे ? असा मार्मिक सवाल त्यांनी केला . मग अशा विश्वास घातक्याला . लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का ? जो कोणाचा झाला नाही तो तुमचा होईल का ? म्हणून आता १९ ची हद्दपारी वाचलेली २०२४ ला अनंत गीते रायगडाच्या राजकारणातून हद्दपार करणार असे जाहीर करतो. असा इशारा अनंत गीते यांनी श्रीवर्धन -रानवली येथे इंडिया आघाडी जनसंवाद मेळाव्यात दिला . पुढे बोलताना ते म्हणाले राज्यात मराठवाडा व इतर ठिकाणी शेतकऱ्यां च्या अनेक समस्या मुळे शेतकरी अत्महत्या करतात कोकणात नाही परंतु आता यापु पुढे ठेकेदार अत्महत्या करतील अशी कदाचित दोन वर्षात परस्थिती निर्माण होणार आहे . कारण निधी अभावी ठेकेदारांकडून कामे करण्यास भाग पाडत आहेत . हि निवडणूक लोकशाही वाचविण्या करीता लोकसभेची निवडणूक आहे . निवडणूकी मध्ये मुस्लीम समाज एकत्रित उतरणार आहे . हे चित्र अखंड रायगडात तसेच देशात आहे . हि निवडणूक हुकूमशाहीच्या विरोधात आहे . एक सदाचारी विरुद्ध भ्रष्ट्राचारी अशी निवडणूक आहे . आपण पाच शक्ती एकत्रित आहोत म्हणून आपली वज्रमूठ आहे . यांच्या कडे वाम मार्गाने पैसा या निवडणूकी येणार आहे . म्हणून या पापाच्या शापाच्या पैशा आपण हात लावणार नाही असा निर्धार करा असे यावेळी मा गीते यांनी सांगितले . या मेळाव्यात संपर्क प्रमुख संजय कदम . माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे . उपजिल्हा प्रमुख नंदु शिर्के , युवा सेना अधिकारी बंटी पोटफोडे , ढाणे , महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप , शेकापचे वसंत यादव , कॉंग्रेसचे लांबे , सुजित तांदलेकर , अरुण शिगवण, दिलप करंदिकर ,तालुका प्रमुख अविनाष कोलंबेकर , सचिन गुरव, गजानन कदम , दिपक देवकर , शहर प्रमुख राजेश चव्हाण, शिवराज चाफेकर, प्राची दुदुस्कर , आदी मान्यवर कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थीत होते .
Comments
Post a Comment