मावळ लोकसभा मतदारसंघात AIFB कडून कामगार नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी जाहीर पनवेल रायगड मत / प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघात AIFB कडून कामगार नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी जाहीर
पनवेल
रायगड मत / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून कामगार नेते शिवाजीराव जाधव हे ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिवाजीराव जाधव यांना AIFB व्यतिरिक्त शेतकरी कामगार पक्ष, भारत राष्ट्र समिती पक्ष यांच्यासह मावळा संघटना, महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती, क्रांतिसूर्य सोशल फाऊंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाऊंडेशन यांचा पाठिंबा मिळाला असून, या सर्वांच्या सहकार्याने आपण 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलून परिवर्तन घडवून आणू असा विश्वास शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केला.
पनवेल येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिवाजीराव जाधव यांनी स्पष्ट केले की त्यांचा लढा हा बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण क्षेत्रातील असमान संधी आणि दुरावस्थेविरोधात असून त्यांच्यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक ही निवडणूक नसून एका सर्वव्यापी आंदोलनाची सुरूवात आहे. या आंदोलनात मावळ मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी सर्वशक्तीनिशी स्वतःची ताकद आणि अस्तित्व दाखवून लढणे आवश्यक आहे आणि बेरोजगारी आणि महागाईमधे होरपळणारा मतदार राजा ही लढाई त्याच पद्धतीने लढून आपल्याला साथ देईल ही गॅरंटी शिवाजीराव जाधव यांनी दिली.
पनवेल येथील या पत्रकार परिषदेचे नियोजन आणि सूत्रसंचालन भारत राष्ट्र समिती पक्षाचे कोकण मुंबई विभागीय समन्वयक विजय मोहिते यांनी केले. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रशेखर पाटील, शेकाप नेते प्रकाश पाटील, मावळा युवा संघटनेच्या नेत्या रूपाली पाटील यांच्यासह पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment