म्हसळा - श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करत फक्त म्हसळा तालुका सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला # म्हसळा तालुक्यात सुनील तटकरे यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, विकासकामे इतकी केली कि म्हसळा तालुक्यातील मतदार झाले खूष # गीते 6 वेळा खासदार झाले, पण केले काय? इलेक्शन आले कि तोंड दाखवायला येतात. तटकरेनी हाणला टोला. # शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करण्याचे खरे काम जयंत पाटील यांनी केला म्हणूनच लोकसभेतील त्यांचे पक्षाचा नामोनिशाण संपुष्टात आला. शेकापची लख्तरेच बाहेर काढली. # रायगड लोकसभा युतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांचा म्हसळा तालुका प्रचार सभांत घणाघात. # म्हसळा तालुक्यात गण निहाय प्रचार सभेत सुनिल तटकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निष्क्रियतेचा वाचला पाढा. # अडचणीचे काळात तुम्ही लोकांसाठी उपयोगात येत नसाल तर आता तुमच्या कर्तुत्वाला होणारे लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला योग्य उत्तर देणार असल्याचे प्रचार सभेला मिळत असलेल्या प्रतिसादा वरून आवर्जुन उल्लेख केला. म्हसळा / रायगड मत प्रतिनिधी
# म्हसळा - श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करत फक्त म्हसळा तालुका सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला
# म्हसळा तालुक्यात सुनील तटकरे यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, विकासकामे इतकी केली कि म्हसळा तालुक्यातील मतदार झाले खूष
# गीते 6 वेळा खासदार झाले, पण केले काय? इलेक्शन आले कि तोंड दाखवायला येतात. तटकरेनी हाणला टोला.
# शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करण्याचे खरे काम जयंत पाटील यांनी केला म्हणूनच लोकसभेतील त्यांचे पक्षाचा नामोनिशाण संपुष्टात आला. शेकापची लख्तरेच बाहेर काढली.
# रायगड लोकसभा युतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांचा म्हसळा तालुका प्रचार सभांत घणाघात.
# म्हसळा तालुक्यात गण निहाय प्रचार सभेत सुनिल तटकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निष्क्रियतेचा वाचला पाढा.
# अडचणीचे काळात तुम्ही लोकांसाठी उपयोगात येत नसाल तर आता तुमच्या कर्तुत्वाला होणारे लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला योग्य उत्तर देणार असल्याचे प्रचार सभेला मिळत असलेल्या प्रतिसादा वरून आवर्जुन उल्लेख केला.
म्हसळा / रायगड मत प्रतिनिधी
निवडणुका तोंडावर आल्या म्हणुन इंडि आघाडी पक्षांतील विरोधक केवळ विरोधाला विरोध करीत टिकाटिपण्णी करणे आणि समाजा-समाजात, जाती- पातीचे राजकारण करत प्रक्षोभक भाषणे देवुन लोकांच्या भावना भडकवत आहेत.माणगाव मोर्बा येथे इंडी आघाडी प्रचाराचे जाहीर सभेते उपस्थित नेते मंडळीने केवळ आमच्या विरोधात बोलून तोंडसुख घेतले परंतु त्यांचे उमेदवार अनंत गीते यांच्या मागील सहा वेळा खासदारकीची आणि १० वर्षे केंद्रीय मंत्री असतानाची कर्तबगारीची दखल घेतली नाही यावरुन हेच दिसुन येते की निवडणुकीच्या हितासाठी समाजा समाजात धर्मा धर्मात विचारभेद करण्यावर भर देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देताना शेकाप नेते जयंत पाटील यांच्या भूमिका स्पष्ट करताना आज शेकापची जिल्हयातील अवस्था काय आहे.आम्ही संविधानाचे आधारावर चालणारे आहोत आम्ही त्यांच्या जवळ कोणतीच प्रतारणा केलेली नाही.वेळोवेळी त्यांनी त्यांची राजकिय भुमिका बदलली आहे मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अलिबाग तालुक्यातून मला १७ हजारांचा लीड दिला होता नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीत तो ३५ हजारांनी कमी झाला या शंके वरून तुम्ही आम्हाला दोष देता मग अलिबागला तुमची ताकत जास्त की आमची हा प्रश्न उपस्थित होतो.तुमच्या या भूमिकेमुळेच शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करण्याचे खरे काम जयंत पाटील यांनीच केला आहे म्हणून लोकसभेतील त्यांचे पक्षाचा नामोनिशाण संपुष्टात आला असल्याचा थेट आरोप खासदार सुनिल तटकरे यांनी भव्य प्रचार सभामधून मनोगत व्यक्त करताना केला.कोरोना काळात, निसर्गचक्री वादळात,अतिवृष्टी झाली तेव्हा अनंत गीते यांना पत्रकारांनी होतात कुठे असा प्रश्न विचारला असता तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया न देता खदखदून हसता यावरून तुमची लोकांसाठी असलेली भावना काय हे दिसुन येते.
अडचणीचे काळात तुम्ही लोकांसाठी उपयोगात येत नसाल तर आता तुमच्या कर्तुत्वाला होणारे लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला योग्य उत्तर देणार असल्याचे प्रचार सभेला मिळत असलेल्या प्रतिसादा वरून आवर्जुन उल्लेख केला.
श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करत फक्त म्हसळा तालुका सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आदिती तटकरे यांनी युती सरकारच्या माध्यमातुन महीला धोरण अवलंबिले आणि महिलांसाठी वेगवेगळ्या क्रांतिकारी योजनाना प्राधान्य दिले आहे. युती सरकारच्या माध्यमातुन मतदार संघात वीज पाणी रस्ते विकास केलाच पण आता रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे.आम्ही सर्वधर्म समभाव जोपासणारे आहोत.आमची नाळ लोकांशी जुळली आहे.आघाडी प्रचार सभेत बाहेर गावाहून नेते येतात आणि आमच्या कर्तुत्वावर टिका करतात पण केवळ लोकांच्या मनात धुळफेक करण्याचे काम सुरू आहे.खासदार सुनिल तटकरे यांनी आयोजीत प्रचार सभेत केंद्र सरकारने काश्मीर येथील ३५४ कलम हटविण्याची भुमिका,स्थलांतरित लोकांना राष्ट्रीयत्व देण्याचा कायदा(एनसीआर)लागु करण्याचे सरकारचे धोरण स्पष्ट केले.विकास कामांचे ठेका घेऊन ते काम पुर्ण करता शेकापचे माजी आमदार पंडितशेट पाटील काम न करता लोकांना त्रास देत आहेत त्याचे पाप तुम्हाला आणखी भोगावे लागतील. सुडाचे राजकारण करत आलात म्हणूनच अलिबागला ३५ हजारांनी पडलात याची युतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी जाणीव करून दिली.तालुका पंचायत समितीच्या गण निहाय प्रामुख्याने पाभरे,वरवठणे,मेंदडी आणि खामगांव या चार गणांत ३२- रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी निवडणूक प्रचाराच्या सभा घेऊन जोरदार रणशिंग फुंकण्यात आले.प्रचार सभेत खासदार सुनिल तटकरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन प्रचाराचा धुरळा उडवत मतदार संघात सन २००९ पासुन केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली आणि भविष्यात करण्यात येणार असलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.
संपन्न झालेल्या सभेत मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले. आयोजीत सभेला माजी सभापती महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,मुंबई अध्यक्ष महेश शिर्के,संघटक जयंत चीबडे, मनसे प्रमुख फैसल फोपेरे,माजी उप नगराध्यक्ष सुनिल शेडगे युवक अध्यक्ष फैसल गीते,जमीर नजीरी,शहर अध्यक्ष रियाज घराडे,मजहर काझी,सेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले,बीजेपी तालुका अध्यक्ष
तुकाराम पाटील,मनसे अध्यक्ष सौरभ गोरेगावकर,राजेश तांबे,माजी सभापती छाया म्हात्रे,संदीप चाचले,महीला अध्यक्षा मिना टिंगरे, सोनल घोले,बिजीपी महीला अध्यक्षा रेखा धारिया,माजी जीप सदस्या हिरा बसवत,रेश्मा काणसे, किरण पालांडे,महेश घोले,अनिल बसवत,निलेश मांदाडकर,भाजप मुंबई प्रमुख मदन वाजे,नाना सावंत, प्रकाश गाणेकर,लहू म्हात्रे,लक्ष्मण कांबळे,मनोहर तांबे, भाजपचे युवा संघटक समीर धनसे,अकमल कादिरी, गाव निहाय सर्व सरपंच आदी मान्यवर पदाधिकारी आणि शेकडो मतदार बंधु भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment