महाराष्ट्रातील कुणबी, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बहुजन समाज या सर्व समाज बांधवांना जाहीर नम्र आवाहन...





महाराष्ट्रातील कुणबी, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बहुजन समाज या सर्व समाज बांधवांना जाहीर नम्र आवाहन...

 रायगड / प्रतिनिधी

कुणबी समाजोन्नती, संघ, मुंबई १०३ वर्षे कार्यरत असलेल्या मातृसंस्थेशी सलग्न असलेल्या कुणबी राजकिय संघटन समीतीच्या पुढाकाराने दिनांक २२ एप्रिल 2023 रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई* येथे स्वातंत्र, समता, बंधुभाव आणी सामाजिक न्याय या तत्वांवर आधारीत *बळीराज सेना* या राजकिय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

           बांधवांनो. आज स्वातंत्र प्राप्तीनंतर सर्वच राजकिय पक्षांनी आपला केवळ मतांसाठी वापर केला आहे, जेथे समाजहितासाठी, कल्याणकारी कायदे व योजना आखल्या जातात तेथेच (लोकसभा, विधानसभा ),शेतकरी विरोधी कायदे, शिक्षणाचे खाजगीकरण, जीवघेणी महागाई, ग्यास, डिझेल, पेट्रोल महाग, बेरोजगारी, भ्रष्टाचार, संपूर्ण कोकण सिडको ला देऊन भांडवदारांच्या घशात घालण्याचं धोरण या सर्व बाबींचा विचार करता राजकिय पक्षांनी आम्हाला विचाराने गुलामच बनवले असून चोर, भ्रष्टाचारी, दरोडेखोर, जनतेच्या पैशावर धन दांडगे रुबाब करून वारसा हक्क दाखवत आहेत, ही शोकांतिका असून हा बहुसंख्येने 85% असलेल्या कुणबी बहुजनांचा वैचारिक दुबळेपणा आहे, तो नाहीसा केलाच पाहिजे या साठीच बळीराज सेना राजकिय संघटना स्थापन झाली असून आपण सर्वांनी समजदारीने, जबाबदारी घेऊन कार्यात झोकून दिले पाहिजे, आणि लोकसभा, विधानसभा, ज़िल्हापरिषद, पंचायत समिती, ज़िल्हा सहकारी, राज्य सहकारी क्षेत्र यासारख्या क्षेत्रात, राजकिय सत्तेमध्ये कुणबी, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन समाजातील नागरीकांना जे राजकिय पक्ष हेतु पुरस्कर डावलतात, केवळ आपल्या समाजाचा मतांसाठी वापर करून . आपल्या पिढ्यान पिढ्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. आमचाच अपमान करून आमच्यावरच घोर अन्याय करीत आहेत. आजवर जे आपल्या मतांवर निवडून येतात ते त्यांचा स्वार्थ साधुन स्वतःचा व स्वतःच्या पिढ्यांचा उध्दार करून घेत आहेत. या देशात, महाराष्ट्र राज्यात जनतेला इंग्रजांनी जेवढे लुटले नाही तेवढे सर्व राजकिय पक्षांतील सत्ताधारी राज्यकर्त्यांनी महागाई, खाजगीकरण , बेरोजगारांची निर्मिती करून लुटत आहेत. शोषण केले जात आहे. श्रीमंत आणी गरीबी यामधील दरी वाढविण्यात सत्ताधारी पक्ष सहभागी आहेत.

         मुंबईसह कोकण विभागात प्रस्थापित राजकिय पक्षांनी आपल्याला प्रतिनिधीत्व नाकारून विशिष्ट वर्गातील दलालांचीच मक्तेदारी चालवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा भारतीय नागरीकांना संविधानातुन दिलेला हक्क "एक व्यक्ती, एक मत" असा मौलीक अधिकार भारतीय राज्यघटनेत दिला आहे. आपल्या सामाजिक शैक्षणीक, आर्थिक, राजकिय सर्व समस्या सोडविण्यासाठी राजकिय सत्ता हिच गुरु किल्ली आहे. आणी ती हस्तगत करणे या धेय्यासाठी बळीराज सेना या राजकिय पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.


            *बळीराज पक्षाची उद्दीष्ट -*


*१)* भारतीय संविधानाच्या धेयधोरणांची सामुदायीक शक्तिच्या माध्यमातून क्रांतीकारी अंमलबजावणी करणे.


*२)* महागाई, बेरोजगारी, सरकारी व सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबविणे, 


*3)* शिक्षणाचे खाजगीकरण थांबवून "वन नेशन - वन एज्युकेशन" प्रभाविपणे सुरू करणे.


*४)* सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुव्यवस्थित करणे.


*५)* शेती व शेतकरी विरोधी कायदे नष्टकरणे.


*6)* S, E, Z, विशेष आर्थिक क्षेत्र कायदा रद्द करणे.


*7)* प्रदुषणकारी कारखाने रद्द करणे.


*8)* राष्ट्रीय जात निहाय जनगणना करणे.


*9)* भ्रष्टाचारी राजकिय पदाधिकारी व अधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही करणे.


*10)* कसेल त्याची जमिन या तत्वानुसार कुळवहिवाटदारांना जमीनींचा मालकीहक 7/12 चे अधिकार अभिलेखात नोंद करणे.

   

*११)* भुमिहिन, अत्यल्पभुधारक, कष्टकरी शेतक-यांना जमीनीची समान वाटणी करणे.


*१२)* देशाची व देशाच्या संपत्तीची मालकी भांडवलदारांच्या घश्यातून काढून तीचे राष्ट्रीयकरण करणे.


*१३)* ग्रामिण-शहरी भागात कृषीक्षेत्राच्या आधारावर रचनात्मक उपक्रम राबविणे.


*१४)* राष्ट्रीय तसेच राज्यस्थरिय अर्थसंकल्पात सर्वांना समान निधींची तरतुद करणे.


*अशी व अशा अनेक उद्दिष्टांसाठी लोककल्याणकारी सम्राट बळीराजा व रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी आदर्श तत्वांचा अंगीकार करून रयतेचे राज्य निर्माण केले,समता, स्वतंत्र, बंधुभावाची संकल्पनेचा तोच आदर्श, उद्देश, ध्येय्य बाळगून बळीराज सेना या आपल्या राजकिय संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, पालघर पासून सावंतवाडी पर्यंत आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागातीलही सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांचे एकीकरण करून अनेक विचारवंतांनी व्यापक विचारांची भूमिका घेतली असून समाज उन्नती साठी आपले योगदान चांगल्या प्रकारे देत आहेत आपणही साथ सहयोग देऊन तन, मन, धनाने सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे.*   

    

            *आपले विश्वासू,*

         *अशोक वालम (अध्यक्ष),*

       *कृष्णा कोबनाक (उपाध्यक्ष),*

         *सुरेश भायजे (उपाध्यक्ष),*

    *नंदकुमार मोहिते (सरचिटणीस),*

       *प्रकाश तरळ (सरचिटणीस),*

     *संभाजी काजरेकर (सरचिटणीस)* *समाज नेते, उप नेते*, 

 *सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते.*

            --------------------------

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर