आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने देशी बनावटीचे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला केली अटक*
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने देशी बनावटीचे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला केली अटक*
पनवेल / (संजय कदम):
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर देशी बनावटीचे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करून अटक केली आहे.
पनवेल रेल्वे स्टेशन, साई मंदिर जवळील पार्किंग परिसरात एक इसम अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक विनोद लभडे यांना बातमीदार यांना मिळाली. त्याप्रमाणे पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस उप निरीक्षक विनोद लभडे, पोलीस उप निरीक्षक अभयसिंह शिंदे यांची दोन तपास पथके तयार करण्यात आली. नमूद दोन पथकांनी रेल्वे स्टेशन परिसरातील साईमंदिर ते रेल्वे स्टेशन येणाऱ्या रोडवर पाळत ठेवली. पोउपनि विनोद लभडे व पथक यांना साईमंदिर रेल्वे स्टेशन जवळ एक इसम संशयित रित्या काळया रंगाची बॅग घेऊन येत असताना दिसला. नमूद इसमावर पाळत ठेवली असता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या, नमूद इसमाकडे सापळा कारवाई पथक जात असताना त्याने रेल्वे स्टेशनकडे पळण्याचा प्रयत्न केला असता तात्काळ पोउपनि अभयसिंह शिंदे व पथक यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर नमूद इसमाकडे चौकशी असता अंकित सुरेश कुमार(वय २३) असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेश मधील राहणार असलयाचे समोर आले. तसेच त्याने पळून जात असताना ताब्यात असलेली बॅग तपास ली असता सदर बॅगमध्ये १२ इंच लांबीचे देशी बनावटीचे अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी नवी मुंबई शहरात १६ मार्च ते ६ जून २०२४ पर्यंत निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हत्यार बंदी आदेश जारी केले असून या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त मिलिंद भांरवे, पोलीस सह आयुक्त संजय येनपूरे, पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत, पोउपनि विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, पोहवा यशवंत झाजम, अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, सुर्यकांत कुडावकर, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, पोशि प्रसाद घरत, किरण कराड, साईनाथ मोकळ यांच्या पथकाने केली आहे.
फोटो: अग्निशस्त्र वविक्रीसाठी आलेल्या आरोपीसह पोलिसांचे पथक
Comments
Post a Comment