चांगू काना ठाकूर महाविद्यालय अर्थात सीकेटी कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिक भरत ठाकूर यांनी पाच लाख रुपये तर राज संजय पाटील यांनी ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान माजी विद्यार्थी संघासाठी दिले.

 




पनवेल (प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणाची नामांकित संस्था असलेल्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय अर्थात सीकेटी कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिक भरत ठाकूर यांनी पाच लाख रुपये तर राज संजय पाटील यांनी  ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान माजी विद्यार्थी संघासाठी दिले. शिक्षणासोबत सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सीकेटी कॉलेज उत्कृष्टपणे काम करीत आहे. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्य बजावत आहेत. आपण ज्या संस्थेत शिक्षण घेऊन मोठे झालो त्या महाविद्यालयाच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रतीक ठाकूर व राज पाटील यांनी आपले आर्थिक योगदान दिले. सदरचा धनादेश त्यांनी प्राचार्य एस. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. 
         प्रतिक भरत ठाकूर यांनी २०१२ मध्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतील व्यवस्थापन अध्ययन (बी.एम. एस.) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण करून उद्योजकता क्षेत्रात आपले कार्य आणि कर्तुत्व सिद्ध केले आहे. तर राज पाटील यांनी २०११ मध्ये टीवायबीए (इतिहास) शिक्षण पूर्ण केले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत पंचायत समिती सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या मूल्यांकन प्रणाली मध्ये महाविद्यालयाच्या विकासातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान या निकषाचे अनन्यसाधारण महत्व आहे. याच्या परिपूर्तीसाठी महाविद्यालयाने सर्व माजी विद्यार्थ्यांना शक्यत्यापरिने माजी विद्यार्थी संघास आर्थिक योगदान देण्याकरिता आवाहन केले आहे. या आर्थिक योगदानाबद्दल आभार व्यक्त करत, माजी विद्यार्थी संघामध्ये जमा होणाऱ्या आर्थिक संसाधनांचे उपयोजन महाविद्यालयाच्या पायाभूत तथा विद्यार्थी केंद्रित सेवांच्या विकासकार्यासाठी करण्यात येईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांनी केले.


दर

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर