खरसई आदर्श शाळेत " चित्रकला कार्यशाळा " संपन्न*





खरसई आदर्श शाळेत " चित्रकला कार्यशाळा " संपन्न*


म्हसळा - २१ मार्च २०२४ रोजी रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी शाळेत चित्रकला विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या विषयावर बहुमोल मार्गदर्शन करण्यासाठी. पनवेल वरून प्रसिद्ध चित्रकार मा श्री प्रकाशजी पाटील सर यांनी चित्रकला विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले , या कार्यशाळेस जवळ जवळ १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,कला विषयावर चित्रकला हा भाग महत्त्वाचा असून मुळात चित्र काढण्याची संकल्पना स्केच कसे काढावे, रेषा कशा पद्धतीने मारावेत, आकार, याबाबत सविस्तर माहिती दिली. चित्र रंगवताना रंगसंगती बध्दता कशी ठेवावी, त्याचबरोबर कला ही जीवनात कशा पद्धतीने उत्कृष्ट ठरते आणि पुढे घेऊन जाते यावर छान माहिती दिली. प्रकाश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले दिग्गज क्रिकेट खेळाडू, उत्कृष्ट चित्रकार, खेळाडू, डिझायनर, कलाकार, व्यावसायिक यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन साधण्याचा पाटील सर यांनी सुंदररित्या प्रयत्न या कार्यशाळेतून केला. खरसई गावात व शाळेत शैक्षणिक कार्य प्रकाश पाटील सर यांच्या उपस्थित व्हावे यासाठी खरसई गावातील शिक्षण प्रेमी महादेवजी म्हात्रे यांनी पाटील सर यांच्याकडे समन्वय साधला.

चित्रकला कार्यशाळेसाठी अथक परिश्रम उपक्रमशील शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर यांनी घेतले, या कार्यशाळेस उपस्थित संदिप जयराम गायकवाड, अंगत कांबळे सर, शाळा कमेटी अध्यक्ष निलेश मांदाडकर, सदस्य गणेश मांदाडकर, रामेश्वर गायकवाड सर भोसले मॅडम , द्वौरका शितकर मॅडम, कार्यक्रम प्रसंगी सुत्रसंचलन संदिप शेबांळे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिरसाट सर यांनी केले गुरूकुल आरोग्य योगपीठ खरसई यांच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार मा श्री प्रकाशजी पाटील सर यांना सन्मान चिन्ह व शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर