"रायगडचा सचिन विठ्ठल भालेराव" राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट्र
"रायगडचा सचिन विठ्ठल भालेराव" राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट्र
(अरुण पाटकर) --
दिनांक 15 मार्च 2024 ते 17 मार्च 2024 या कालावधीत कर्जत येथे राज्यस्तरीय सीनियर व मास्टर्स (पुरुष व महिला) क्लासिक स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धा पावर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड आणि कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडूनी भाग घेतला होता. दोन दिवस झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पंच म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस रायगडचे सहसचिवआणि पंच सचिन विठ्ठल भालेराव यांना देण्यात आले. राजहंस मेंहदळे (पुणे)आणि संजय सरदेसाई यांच्या
द्विसदस्य समितीने स्पर्धेतील पंचांचे कामगिरीचे अवलोकन करून सदर निर्णय घेतला. प्रथम क्रमांकाचे पंच म्हणून मुंबई जिल्ह्याचे समीर दळवी आणि द्वितीय क्रमांकाचे पंच म्हणून राकेश पाटील नवी मुंबई यांची निवड झाली.
सचिन भालेराव यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी पुणे येथे झालेल्या स्पर्धेत सुद्धा त्यांना सर्वोत्कृष्ट पंच तृतीय क्रमांक म्हणून निवड झाली होती. डी वाय पाटील कॉलेज बेलापूर येथे कार्यरत असलेले सचिन भालेराव यांना मिळालेल्या बहुमानाबाबत पावर लिफ्टिंग पुढचा सेशनचे अध्यक्ष गिरीश वेदक ,कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि माधव पंडित, खजिनदार राहुल गजरमल यांनी आनंद व्यक्त करून सचिन भालेराव यांच्या अभिनंदन केले आहे. सचिन भालेराव यांच्या यशाबाबत त्यांच्या कुटुंबीय वडील विठ्ठल भालेराव, आई कांताबाई भालेराव, पत्नी हर्षदा भालेराव, भाऊ तुषार भालेराव, सोनी तुषार भालेराव यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment