क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून उदघाटन*
क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून उदघाटन*
खोपोली : पॉवर लिफ्टींग स्पोर्टस असोशिएशन रायगड (रजि.) या संघटने तर्फे भैरवी मंगल कार्यालय, मुळगाव, श्रीराम नगर , जुना मुंबई- पूना महामार्ग वोटसीला कंपनी जवळ येथे जिल्हा स्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धा नवोदित, सिनिअर, मास्टर (1,2,3,4) पुरुष व महिला गटासाठी आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत, खालापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रविण क्षीरसागर, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अबुभाई खोत,पॉवरलिफ्टंग स्पोर्टस असोशिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सेक्रेटरी संजय देसाई, पंजाब नेशनल बैंक पनवेलचे प्रबंधक संगीता चौलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर जिल्हास्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.यावेळी व्यायामाचे महत्व विशद करून सर्व स्पर्धेतील उमेदवारांना महेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सतीश पटाडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त साहिल उतेकर, मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त समीर दळवी ,जितेंद्र यादव, तसेच सुरेश धुळप गोपीनाथ पवार अंकुश सावंत उत्तम धुरी, प्रशांत सरदेसाई मुंबई उपनगर चे विशाल मुळये हे पंच म्हणून हजर होते. तर स्पर्धेला सहाय्यक म्हणून शशिकांत वाघमारे ,विराज पावस्कर,अवनीश कांबळे ,मोरेश कारले प्रांजल पाटेकर ,अनुराग खरात,सागर मेहत्रे तन्मय माधव हे उपस्थित होते.
या स्पर्धेत नवोदित स्ट्रॉंग मॅन ओमकार जाधव हा झाला. तर महिलांमध्ये स्ट्रॉंग वुमन नवोदित चा किताब अश्विनी वास्कर यांना मिळाला. या स्पर्धेसाठी विक्रांत गायकवाड यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते त्यासाठी त्यांना नितीन शेजवळ (बॉडी लाईन जिम खोपोली), अक्षय क्षनमूगम(आयर्न मॅट जिम खोपोली), जाधव जिम खोपोली, हृतीक पोळ,सुरज धिमल आणि स्पोर्ट्स डायरेक्टर के एम सी कॉलेज चे जयवंत माने. यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य झाले.
Comments
Post a Comment