जमातुल मुस्लिम संस्था, म्हसळा यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन





जमातुल मुस्लिम संस्था, म्हसळा

यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन

म्हसळा : दि. २०/०२/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता जमातुल मुस्लिम संस्था म्हसळा या संस्थेच्या वतीने एस.टी. स्टॅन्ड येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी जमतुल मुस्लिम म्हसळा सचिव साजिद हुर्जुक, शुएब घराडे, शौकत घरटकर, मुनीर जमादार, फारुक डोसानी, बुरहान वसगरे, नईम दळवी, मुजीब साने, अभय कळमकर, मनोहर तांबे, अकमल कादरी, शहजाद लांबे, शाहनवाज उकये, अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बाजारा मध्ये हि पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी थंड फिल्टर पाण्याचे जार जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी जनतेने या थंड पाण्याच्या पाणपोईचा लाभ घ्यावा. कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज भासत असेल तर आपण संस्थेकडे संपर्क साधावा. पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येईल. एस.टी. स्टॅन्ड मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये तसेच उन्हाळा चालू झाला आहे, उन्हामुळे माणसाला खाण्यापेक्षा पाण्याची जास्त गरज लागते. म्हणून संस्थेने हि पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचे ठरविले. आज पासून संस्थेने वरिष्ठांच्या हस्ते उदघाटन करुन जनतेसाठी अनमोल सेवा सुरु केली आहे तरी जनतेने या सेवेचा मनसोक्त लाभ घ्यावा अशी संस्थेच्या वतीने विनंती.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर