पनवेल राज क्लब, कपल क्लब आणि कामोठे विनम्र क्लब येथे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आशिर्वादाने मोठे जुगाराचे अड्डे - अॅड. काशिनाथ ठाकूर
पनवेल राज क्लब, कपल क्लब आणि कामोठे विनम्र क्लब येथे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आशिर्वादाने मोठे जुगाराचे अड्डे - अॅड. काशिनाथ ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी)
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे राज क्लब, भिंगारवाडी येथे काळुंद्रे गावाजवळ कपल क्लब आणि कामोठे येथे विनम्र क्लब या तीन ठिकाणांवर बेकायदा जुगाराचे अड्डे/धंदे सुरू असून यांपैकी कपल क्लब येथे कपल लेडीड डान्स बारमध्ये देखील रात्री उशीरापर्यंत बेकायदा व नियमबाह्य प्रकारांचा धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उघडकीस आणलेला आहे.
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे "राज क्लब" मध्ये, काळुंद्रे गावच्या हद्दीत असलेल्या "कपल" क्लबमध्ये, तसेच कामोठे येथील "विनम्र" क्लबमध्ये 3 पत्ती, 13 पत्ती पॉईंट रम्मी, 21 पत्ती पॉईंट रम्मी, 27 पत्ती पॉईंट रम्मी हे जुगाराचे गेम खेळले जात असून येथे 10 रू, 20 रू, 50 रू, 100 रू, 200 रू, 500 रू. अशा पॉईंटने जुगार खेळला जात आहे. विशेष म्हणजे कपल कपल लेडीज डान्स बारमध्ये तर किळसवाण्या प्रकारांनी कहर केला असून येथे तर रात्री उशीरापर्यंत भलताच धिंगाणा सुरू असून इतके भयानक प्रकार सुरू असताना पोलीस झोपा काढतात का? असा संतप्त सवाल अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
हा जुगार क्लब आणि लेडीज डान्स बार चालविणाऱ्यांनी पोलीसांना लाखोंचा हप्ता देऊन पोलीसांचे "तोंड" बंद केल्याचे निदर्शनास आलेले आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांच्या वरदहस्तामुळेच हे बेकायदेशीर प्रकार सुरू असून या परिसरात पोलीसांच्या कार्यपद्धतीबद्दल महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथील कपल लेडीज डान्स बारमध्ये सुरू असलेले बेकायदा, नियमबाह्य, अनैतिक प्रकारांमुळे, तसेच जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. परिणामी या बेकायदा प्रकारांविरूद्ध तातडीने कारवाई करून काळुंद्रे - पनवेल कपल लेडीज डान्स बार, कपल क्लब,कामोठे येथील विनम्र क्लब आणि सुकापूर येथील राज क्लब हे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment