सामाजिक सभागृह व जल जिवन मिशन योजना यांचे लोकार्पण
सामाजिक सभागृह व जल जिवन मिशन योजना यांचे लोकार्पण
श्रीवर्धन / राजू रिकामे
रविवारी यादव गवळी समाज विकास मंडळ सायगाव, येथे यादव गवळी समाज सभागृह व जल जिवन मिशन योजना सायगाव - गौळवाडी चे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुका असो वा विधानसभा निवडणुका. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार येणार आहे, देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हेच होतील व केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. असा विश्वास खा. सुनील तटकरे यांनी सायगांव येथील जलजीवन मिशन योजना व सामाजिक सभागृह लोकार्पण दरम्यान व्यक्त केला.
तटकरे यांनी कर्तव्यपूर्तीचे समाधान एखाद्या कामाची पूर्तता झाल्यावर मिळते असे सांगीतले. य पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा व सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला याचा मला आनंद होत आहे.. नदीचा प्रवाह बंदिस्त करत पाण्याची योजना उत्तम प्रकारे राबवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत असताना आदिती तटकरे या पालकमंत्री असतांना त्यावेळी सायगांव येथील
जलजीवन मिशन योजनेला मान्यता दिली होती त्या योजनेची आज पूर्तता होत असल्याचे समाधान मला होत असल्याचे त्यांनी नमूद केले. १९९५ ते २००९ सालापर्यंत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात विकासकामे होऊ शकली नाहीत. या काळात धर्म, जात, भावना यांच्या आधारे राजकारण खेळण्यात आले. समाजा-समाजात धर्मा-धर्मात दुरावा निर्माण झाला. यामुळे विकास राहिला बाजूला आणि भावनांप्रती राजकारण सुरू असल्यामुळे विकासकामे रेंगाळली होती पण आता राहिलेला अनुषेश भरुन काढायचा आहे. हज- ारो कोट्यावधी रुपयांचा निधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आणून पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे आहेत असे सांगितले.
या लोकार्पण सोहळ्या मध्ये महाराष्ट्र यादव चॅरीटी ट्रस्ट विश्वस्त प्रकाश रिकामे, श्रीकृष्ण यादव गवळी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, कार्याध्यक्ष म. या. चॅ. ट्रस्ट श्रीवर्धन मोहन लाड, विद्यमान सरपंच स्वाती निगुडकर, गवळी समाज माजी अध्यक्ष दिगंबर महाडिक, सायगाव स्थानिक अध्यक्ष अनंत गो. लाड, मा. सरपंच लिलाधर रिकामे, मुंबई अध्यक्ष किशोर लाड, उपाध्यक्ष विकास तांबडे, सेक्रेटरी सागर रिकामे व स्थानिक व मुंबई कमिटी तसेच यादव गवळी समाज विकास मंडळ, सायगांव मुंबई (रजि.), श्रीकृष्ण विकास महिला मंडळ सायगाव-गौळवाडी, अमरदीप क्रिकेट संघ, रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment