पॉवरलिफ्टिंग खेळाडू ते पदाधिकारी "देवदत्त मार्तंड भोईर"यांना ठाणे संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार
पॉवरलिफ्टिंग खेळाडू ते पदाधिकारी "देवदत्त मार्तंड भोईर"यांना ठाणे संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार
पॉवरलिफ्टिंग खेळाडू ते पदाधिकारी "देवदत्त मार्तंड भोईर"यांना ठाणे संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार
अरुण पाटकर/नवीन पनवेल
आंतरराष्ट्रीय पदक विजेते जेष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू "देवदत्त मार्तंड भोईर"यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार पॉवरलिफ्टिंग संघटना ठाणे यांनी दिला. ठाणे जिल्हातील शहापूर या मूळ गावी जन्मलेले देवदत्त भोईर.यांना लहानपणापासून मैदानी खेळ व व्यायाम यांच्या आवड होती. देवदत्त भोईर यांनी पावर लिफ्टिंग या खेळामध्ये विशेष आवड निर्माण झाल्याने जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पथक प्राप्त केले आहे. 2007 मध्ये आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी सहभाग घेऊन दोन सुवर्ण दोन रोप्य व एक कास्य पदक मिळविले. नुकतेच वयाच्या 71 व्या वर्षात पदार्पण केलेले देवदत्त भोईर हे २०११ मध्ये उद्योग उर्जा व कामगार विभाग या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.कोणत्याही प्रकारचे फूड सप्लीमेंट घेतलेले नाही. राष्ट्रीय पंच स्तर १ म्हणून त्यांची ख्याती आहे. ठाणे जिल्हा खेळाडू ते जबाबदार पदाधिकारी म्हणून पॉवरलिफ्टिंग संघटनेत विविध महत्त्वाच्या पदावर काम करून पॉवरलिफ्टिंग खेळाची व्याप्ती त्यांनी ग्रामीण भागात सुद्धा वाढविली आहे. यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मोलाची मदत केली. कोणतेही आर्थिक फायद्याची अपेक्षा नसलेले प्रसिद्धीपासून दूर असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच देवदत्त भोईर होय. असे ठाणे जिल्ह्यासह पावर लिफ्टिंग मध्ये महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. खेळाडू ते जबाबदार पदाधिकारी म्हणून 33 वर्ष पॉवरलिफ्टिंग मध्ये चांगले संघटनात्मक कार्य त्यांच्याकडून झाले.या कार्याची दखल ठाणे जिल्ह्यातील त्यांचे नवनियुक्त युवा सहकारी यांनी घेतली. यामधे ठाणे पॉवरलिफ्टींगचे अध्यक्ष नितीन कुडाळकर, सचिव प्रा. नवनाथ गायकर, माजी अध्यक्ष विनायक कारभारी ,राजेश लांजेकर.यांनी यासाठी अध्यक्ष युवा सेना लोकसभा अध्यक्ष क्रीडाप्रेमी नितीन लांडगे यांनी आयोजित केलेल्या नवोदित स्पर्धेत
शिवसेना ठाणे जिल्हा (शिंदे गट)शहराध्यक्ष श्री रमेश पवार यांचे शुभ असते "जीवनगौरव पुरस्कार" रविवार दिनांक ०४/०२/२०२४ रोजी ठाणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू देवदत्त भोईर यांना दिला.33 वर्ष अविरत काम केले. यासाठी श्री देवदत्त भोईर यांना त्यांच्या पत्नी सुरेखा भोईर आणि कुटुंबीय यांचा मोलाचा सहयोग झाला आहे. म्हणून देवदत्त भोईर याचा गौरव केला. याप्रसंगी देवदत्त भोईर यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा देवदत्त भोईर यांचा सह शाल श्रीफळ, सौभाग्य लेणं आणि सन्मानपत्र , मानचिन्ह आणि 10हजार रुपयाचा धनादेश दिला.
ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू देवदत्त भोईर (ठाणे जिल्हा)यांना ठाणे संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सचिव अरुण पाटकर अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव यांनी खास अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग संघटनेचे सचिव संजय सरदेसाई, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.तसेच त्यांचे जवळचे मित्र मंडळी आणि नातेवाईक यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला.
Comments
Post a Comment