रायगडची पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रविवारी 3 मार्च रोजी होणार...
# पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड
# रायगडची पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रविवारी 3 मार्च रोजी होणार...
पनवेल (प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नवोदित,सीनिअर,मास्टर( पुरुष आणि महिला) या
स्पर्धा रविवार दिनांक ०३/०३/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ही भैरवी मंगल कार्यालय, मुळगाव श्रीराम नगर, जुना मुंबई पुणे हायवे, वॉटसिला कंपनी जवळ,खोपोली, जिल्हा - रायगड"येथे होणार आहे तरी या स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी याची नोंद घ्यावी आणि वजनासाठी वेळेवर म्हणजे सकाळी ०९.ते ९.३० या वेळेत.हजर राहणे अपेक्षित आहे.
तरी व्यायाम शाळा/जिम /हेल्थ क्लब संचालक व्यवस्थापक प्रशिक्षक यांनी संबंधित खेळाडूंना योग्य त्या सूचना द्याव्यात. स्पर्धेसाठी गोल गळा बनियन (जिम चे नावाचे असावे), कॉस्च्युम, पायामध्ये शूज, कमरेचा पट्टा अशा प्रकारचा गणवेश असणे आवश्यक आहे.
मास्टर गटातील खेळाडूंनी वयाचा मूळ पुरावा झेरॉक्स कॉपी सह आणणे आवश्यक आहे.
सदर जिल्हास्तरीय स्पर्धेतून राज्यस्पर्धात संघ पाटविला जाणार आहे. याबाबत नोंद घ्यावी.
*तसेच जे स्पर्धक दुहेरी स्पर्धेत भाग घेतील व विजयी होतील. टोटल चांगली असेल तर सदर खेळाडूला एकाच राज्य स्पर्धेत निवड करण्यात येईल.
नवोदित ही स्पर्धा प्रथमच पॉवरलिफ्टिंग करणाऱ्या खेळाडूंसाठीच आहे. सदर स्पर्धेतील खेळाडू त्याच्या वयोमानानुसार इतरही स्पर्धा खेळू शकेल.
. तरी कृपया सर्व संस्था संचालक व्यवस्थापक खेळाडू प्रशिक्षक यांनी स्पर्धेसाठी सहकार्य करावे. ही आग्रहाची विनंती.
सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी कोणतेही उत्तेजक घेतले नसल्याबाबत हमी पत्र भरून देणे अपेक्षित आहे. असे पत्रक प्रसिद्धीस "अरुण लक्ष्मण पाटकर ,सचिव (9969852086)यांनी दिले आहे. या स्पर्धासाठी खोपोलीचे पॉवरलिफ्टिंग खेळाडू आणि प्रशिक्षक "विक्रांत गायकवाड" आणि पनवेल चे सचिन विठ्ठल भालेराव ,सहसचिव हे हे व्यवस्थापन समिती म्हणून काम करीत आहेत.
Comments
Post a Comment