पनवेल, नवी मुंबई हद्दीतील डान्सबारमधील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला पोलीस आयुक्त का घाबरतात? - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर




पनवेल, नवी मुंबई हद्दीतील डान्सबारमधील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला पोलीस आयुक्त का घाबरतात? - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर


पनवेल आणि नवी मुंबईच्या हद्दीतील डान्स बार, हॉटेल, लॉजिंग याठिकाणी वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असून या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आल्याचे चित्र समोर दिसू लागले असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. येथील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला नवी मुंबई पोलीस आयुक्त का घाबरतात? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.  

पनवेल येथील जगदंबा बार, चाणक्य बार, कपल बार, ग्रिट्स बार, कोनगाव येथील टायटन, नाईट रायडर, चांदणी, मूननाईट, स्वामी, माया बार, बिनधास्त, आयकॉन, बाँबे बार, कळंबोली येथील तानसा बार, कॅप्टन बार, तळोजा येथील चंद्रविलास बार, तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार, निसर्ग बार, कोन येथील नटराज बार (व्ही.आय.पी. रूम), साई दर्शन बार (पहिला मजला), वेल्वेट बार (रात्री २ नंतर) येथे वेश्या व्यवसाय सुरू, कोपरखैरणे येथील बेला, सावली, रबाळे एम.आय.डी.सी. येथील संगम, मूड, सेल्फी, मायरा, विटावा, सूरसंगीत डान्स बारमध्ये धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या बेकायदा प्रकारांना पायबंद कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. येथील सर्वच डान्सबारमध्ये धांगडधिंगा सुरू असल्यामुळे याठिकाणी आंबटशौकीनांची मोठी गर्दी होताना दिसत असते. या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आलेले असून येथे डान्स बार च्या नावाखाली मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा सुरू असतो; तर काही बारमध्ये रात्रभर हुक्का सुरू असतो. इतकी भयानक परिस्थिती असताना पोलीस आयुक्त कारवाई का करीत नाहीत? कारवाई करायला पोलीस आयुक्त घाबरतात का? असा प्रश्न अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर