महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन




महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन

क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या निर्णयामुळे" शिवछत्रपती पुरस्कार साठी तरुण खेळाडूंचे भविष्य अंधारात*"--संजय सरदेसाई, सरचिटणीस ,महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन

   आपल्या कामगिरीने महाराष्ट्रात भारतामध्ये व जगामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतास सर्वाधिक पदक मिळवून देणारा *पॉवरलिफ्टिंग*या खेळास राज्य क्रीडा व युवक संचालनालय विभागाच्या हुकूमशाही व एकाधिकारशाही मुळे या खेळास राज्य क्रीडा मंत्रालयाने वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

.या खेळाबरोबरच शरीर सौष्ठव,कॅरम, बिलियर्डस - स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ व याटिंग आदी सात खेळ या पक्तीत घेतले आहेत.

     पॉवरलिफ्टींग या खेळाच्या अखिल भारतीय विद्यापीठ, अखिल भारतीय पोलीस,अखिल भारतीय सिव्हील सर्विसेस, अखिल भारतीय वनविभाग ,अखिल भारतीय कौल इंडिया,अखिल भारतीय पोस्टल विभाग, अखिल भारतीय शालेय अजिंक्यपद यांच्या स्पर्धांचा आयोजन केले जाते .त्यामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक खेळाडू सहभागी होत असतात व आपल्या कामगिरीने खेळाडू महाराष्ट्राचे नाव मोठे करत असतात कारण या खेळाडूंना त्या विभागात खेळाडू म्हणून नोकरी मिळालेली आहे. राज्य क्रीडा मंत्रालयाच्या या मनमानी निर्णयामुळे या खेळाडूंच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत व त्यांचे भविष्य अंधारमय होण्याची शक्यता आहे. व त्याची पुसटशी पण कल्पना राज्य क्रीडा मंत्रालयाच्या सनदी अधिकाऱ्यांनी असोसिएशनला दिलेलं नाही ही दुर्दैवी बाब आहे.

'पॉवरलिफ्टिंग'हा खेळ महाराष्ट्रात १९७५ पासून खेळला जातो या खेळाची पहिली वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा देखील महाराष्ट्रात खेळवली गेली होती. त्याचबरोबर या खेळाची पहिली राष्ट्रीय शालेय पाॅवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा देखील महाराष्ट्रात पुण्यामध्ये खेळवली गेली होती. या खेळाच्या आतापर्यंत ४९ राष्ट्रीय स्पर्धा आयोजन केले आहेत

       पाॅवरलिफ्टिंग खेळामध्ये आत्तापर्यंत ०५ अर्जुन पुरस्कार व ०१ द्रोणाचार्य पुरस्कार द राष्ट्रीय पातळीवर देण्यात आलेले आहेत.

त्याचबरोबर १९८२ पासून महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा कल्याण विभागाने ०२ जीवनगौरव पुरस्कार, ०३ दादोजी कोंडदेव पुरस्कार, ०५ शिवछत्रपती कार्यकर्ता पुरस्कार, ५५ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू पुरुष व महिला व ०७ जिल्हा क्रीडा पुरस्कार खेळाडू व कार्यकर्ता अशा पुरस्काराने आमच्या खेळाडूंना सन्मानित केलेले आहे.

या खेळामध्ये खेळत असलेल्या कामगार कॉलेज आणि युवक हे मध्यमवर्गीय व गोरगरीब कुटुंबातील आहेत या खेळाडूने मेहनतीने मिळवलेल्या पॉवरलिफ्टिंग खेळाचा,पदकांचा व खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व क्रीडामंत्री यांनी दखल घेऊन या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना न्याय मिळवून दिला होता आणि त्याचमुळे भारतीय रेल्वे, 

सीमाशुल्क विभाग, आयकर विभाग,वनविभाग,पोस्टल विभाग नेव्हल डॉकयार्ड ,माझगाव डॉकयार्ड,पोलीस, जिल्हा परिषद ग्रामपंचायत, कृषी अधिकारी , मत्स्यपालन अधिकारी , एअर इंडिया, मंत्रालय ,संरक्षण विभाग टेलीफोन निगम ,सेल्स टॅक्स इत्यादी विविध आस्थापनांमध्ये या खेळाचे खेळाडू नोकरीस आहेत.

क्रीडा व युवक कल्याण विभाग अद्यावत व्यायाम शाळा उभारण्यासाठी ०६ ते १५ लाखाचा राज्य क्रीडा विकास निधी मंजूर करत असते व अशा खेळास वगळून महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाडूंवर व खेळांवर एक प्रकारे अन्याय केला आहे.

  या खेळांमुळे आम्ही तरुणांना अनेक व्यसनांपासून तसेच रेव्ह पार्ट्या, मोबाईल व आत्महत्या यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतो व या खेळामध्ये समाविष्ट असलेल्या स्कॉट बेंच प्रेस व डेडली या प्रकारामुळे इतर खेळाडूंना पण देखील फिटनेस राखण्यासाठी या खेळाचा सराव करत असतात पण या सगळ्या गोष्टीला राज्य क्रीडा व युवक सेवा कल्याण संचालनालय विभागाच्या निर्णयामुळे पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

या खेळाची कामगिरी.

*

अर्जुन पुरस्कार विजेते व जागतिक विक्रमवीर-

इदोदी संजीवन भास्करन


शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार मानकरी* - श्री मधुकर महादेव दरेकर 

श्री विभिषण पाटील.

 *उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक* - दिलीप एकनाथ केळुस्कर, श्री मधुकर महादेव दरेकर, श्रीमती सरला शेट्टी

 *शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ते पुरस्कार -* श्री विभिषण भीमसेन पाटील,श्री.मधुकर लक्ष्मण पाटकर, श्री.मदन भास्कर

 *शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (खेळाडू) पुरुष-* 

कै.मधुकर महादेव दरेकर, लोकेश मेंडन,विश्वनाथ सालियन नागेश पुजारी, संदीप सावंत,इदोदी संजीवन भास्करन , अनंत चाळके,रमेश कांचन, सूर्यकांत गर्दे,संजय माधव,उदय शिंदे,संजय रहाटे ,सतीश पाताडे , संतोष बुरटे,संतोष बांद्रे, संतोष शिंदे, महेश पेडामकर ,विक्रम सिंग अधिकारी ,रविंद्र पवार, रामदास खरात, पलविंदर सिंग सैनी, माणिक ठोसरे,संदीप आवारी , संजय सरदेसाई ,प्रेमनाथ कदम, मनोज मोरे,साहिल उतेकर, अभिजीत गुरव.


 *शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (खेळाडू) महिला-* 

अलका कुलकर्णी, रक्षा महाराव , मधुमती कटके, कै.सरला शेट्टी, विजया नर , ज्योती शिंदे, उमा जाधव ,कल्पना सावंत, पल्लवी गुडे ,विजया कोरगावकर, सुरेखा नाईक, विद्या कर्वे, दीप्ती वायकर निशा साटम, दिपाली कुलकर्णी हिरकणी धांडे, सरस्वती गुंजाळ, दिपाली जळगावकर, शुभस्वा शिखरे, अपर्णा घाटे, नाजुका घारे श्रेया बोर्डवेकर, सोनल सावंत,


संजय सरदेसाई,

 सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर