संवर्धनाची ८० कासव पिल्ले हरिहरेश्वर-मारळ येथील समुद्रमध्ये सोडण्यात आले.
संवर्धनाची ८० कासव पिल्ले हरिहरेश्वर-मारळ येथील समुद्रमध्ये सोडण्यात आले. श्रीवर्धन, राजू रिकामे (रायगड मत) श्रीवर्धन मधील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पंचक्रोशीतील मारळ आगर येथील समुद्रकिनाऱ्यावरील कासव घरट्यातून बाहेर पडलेल्या ८० पिल्ले यांना समुद्रात सोडण्यात आले. या पर्वातील रायगड जिल्हात सर्वप्रथम श्रीवर्धन तालुका ग्रामपंचायत मारळ हरिहरेश्वर आगर या समुद्रकिनारी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवारी कासवाचे पहिले घरटे तयार झाले होते. सह्याद्री निसर्ग कासव संवर्धन, श्रीवर्धन वनविभाग यांच्या अधिपत्याखाली कासव संवर्धन मारळ हरिहरेश्वर आगर.. हरिहरेश्वरला लाभलेला सुंदर समुद्र किनाऱ्यावरती ह्या हिवाळ्याच्या सुखद पर्वा मध्ये कासव हे समुद्रकिनाऱ्यावरती असलेल्या वाळूमध्ये आपली अंडी घालण्याकरिता येत असतात. यावर्षी दि. २९/१०/२०२३ रोजी या समुद्रकिनारी पहिले घरटे दाखल झाले. प्रजनन कालावधी करिता एकूण ६४ दिवसाचं कालखंड असावा लागतो परंतु सध्या झालेल्या हवामानाच्या बदलामुळे हवेमध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ४७ दिवसांमध्ये १७ दिवस अगोदरच कासवांची पिल्ले