Posts

Showing posts from December 7, 2023

दारूबंधीचा यलगार छेडणारी रायगड मधील पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य ठरल्या - उषा गणपत वारगडा

Image
# दारूबंधीचा यलगार छेडणारी रायगड मधील पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य ठरल्या - उषा गणपत वारगडा   # पहिल्याच सभेत, घेतला पहिलाच विषय.. दारु बंद करा, बंद करा!   सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती पनवेल/ प्रतिनिधी @raigadmat.page     मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात आहे, शिवाय या भागामध्ये आदिवासी समाजाची अधिक लोकवस्ती असल्याने तालुक्यात आदिवासी ग्रामपंचयात म्हणून ओळखली जातेय.          या मालडुंगे ग्रामपंचायतमध्ये कोंडीचीवाडी, टावरवाडी, सातीचीवाडी, कोंबलटेकडी, ताडपट्टी, मालडुंगे, धोदाणी, पिंपलवाडी, चिंचवाडी, वाघाचीवाडी, बापदेव, देहरंग, धामणी, हैाशाचीवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र, यातील काही गावांमध्ये दारू विक्री होतांना दिसत आहे. या दारूमुळे अनेक कुटुंबामध्ये भांडण होतात, तर काहीकांची कुटुंबच उध्वस्त होताना पाहतोय. एवढाच नाही तर दारूमुळे शाळकरी विद्यार्थ्य

दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; ४ गुन्हयांची केली उकल

Image
*दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; ४ गुन्हयांची केली उकल* पनवेल (संजय कदम):  दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या कडून आतापर्यंत ४ गुन्हयांची उकल केली आहे. तसेच जवळपास ९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.                   सिबीडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील अज्ञात आरोपीनी फिर्यादीच्या घरातून २०६ ग्रॅम वजनाचे सोने व १० हजार रू रोख रक्कम असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज दिवसा घरफोडी करून पसार झाले होते. सीबीडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेवून सुमारे २०० च्या वर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत यातील आरोपी निष्पन्न केले व आरोपींचा नाशिक, शिर्डी, सातारा, कोल्हापूर, पुणे व पालघर परिसरात शोध घेवून ते गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना गुजरात सीमेवर अच्छाड ता. तलासरी, जि. पालघर येथून अटक केली आहे. नमूद आरोपींना सदरील गुन्हयात अटक करून त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपुर