Posts

Showing posts from December 6, 2023

रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.* *शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.*

Image
रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.*  शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.*  श्रीवर्धन :  अनेक वर्ष पासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्ग मधे गेली ते आजही आपले भरपाईची वाट पाहत आहेत. असाच एक प्रकार म्हसळा येथे ज्येष्ठ नागरिक शरीफ हळदे यांचे सोबत घडला आहे. गरीब शेतकरी ची जागा मौजे सकलप स.नं १९/१ ही भूसंपादन करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते दिघे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. आज ही ते मोबदलाची वाट पाहत आहेत. वेळो वेळी अर्जाला केराची टोपली दाखवली गेली अखेर त्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. दिनांक ०५ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी अर्ज देऊन १५ दिवसात जर मोबदला मिळाला नाही तर मी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे आणि या अर्जाची परत राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथ

व्यायाम शाळेत लोखंडी रॉड व लोखंडी बेंच चोरी : म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Image
व्यायाम शाळेत लोखंडी रॉड व लोखंडी बेंच चोरी : म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल म्हसळा - राजीव नेवासेकर:  म्हसळा- बेलदार वाडी येथील व्यायाम शाळेत २ लोखंडी रॉड व १ लोखंडी बेंच चोरी झाल्याची तक्रार डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यायाम शाळेचे अध्यक्ष शाहिद उकये यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.      त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि,मी शाहीद अब्दुल उकये म्हसळा बेलदार वाडी येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर व्यायामशाळेचे अध्यक्ष म्हणुन गेले 2004 पासून काम करीत आहे. सदर व्यायामशाळेत म्हसळा, नवानगर, म्हसळा शहर, म्हसळा बायपास येथील मुले व्यायाम करण्याकरीता नेहमी येतजात होती. आमची व्यायामशाळा ऑगस्ट-2022 पासुन बंद असुन सदर व्यायामशाळेस आम्ही कुलुप लावुन ठेवलेले होते. सदर व्यायामशाळेत एक रनिंग मशीन, तीन चेस्ट मशिन, चार लोखंडी बेंचेस, 20 डबेल्स, 4 लोखंडी रॉड असे सामान होते.       दि. 02डिसेंबर 2023 रोजी रात्रीचे 03.15 वाजताचे सुमारास सागर चव्हाण याने फोनद्वारे कळविले कि, आज दिनांक-02/12/2023 रोजी रात्रीचे 03.00 वाजताचे सुमारास मी तसेच शरद चव्हाण, भरत चव्हाण, मुनीम हुर्जुक असे आम्ही व्यायामशाळेच्या