जल जीवन मिशनचे हालच हाल, ठेकेदार - अधिकारी मात्र झाले मालामाल... - निलेश मांदाडकर जल जीवन मिशन योजनेला वाली कोण? म्हसळा (रायगड मत)
जल जीवन मिशनचे हालच हाल, ठेकेदार - अधिकारी मात्र झाले मालामाल... - निलेश मांदाडकर जल जीवन मिशन योजनेला वाली कोण? म्हसळा (रायगड मत) देशाचे सन्माननीय पंतप्रधाननरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून "आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत असताना ग्रामीण भागातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यत पिण्याचे पाणी मिळण्यासाठी '"हर घर नळ हर घर जल "'ही संकल्पना प्रभाविपणे राबविण्याचे उद्दिष्ट मा. पंतप्रधान यांनी जाहीर केले. रायगड जिल्यातील अनेक तालुक्यामध्ये जल जीवन मिशन योजने मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत आहेत. या योजणांना भरघोष निधी प्राप्त झाल्या संबंधित ऑनलाईन ठेकेदारांच्या नावे काही ठिकाणी मर्जीचे सबठेकेदार तर काही ठिकाणी कर्मचारीच ठेकेदार बनले. ग्रामसभेला महत्व व जलजीवन मिशन योजना कमेटी ला कागदावरच ठेऊन संबंधित अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने जल जीवन मिशन योजना किमान २५वर्षासाठी इस्टिमेंट मूल्यांकन झालेले असताना सुमार दर्जाचे काम चालू आहेत. अनेकवेळा कार्यालयात माहिती घेतली असताना उपाभियंता कनिष्ठ अभियंता ते हंगामी कंत्राटी अभियंत