आजपासून नवी मुंबई मेट्रो ट्रेन सुरु, 'रायगड मत' ने अनेक वेळा मेट्रो सुरु करणे संदर्भात आवाज उठवला होता.
आजपासून नवी मुंबई मेट्रो ट्रेन सुरु, 'रायगड मत' ने अनेक वेळा मेट्रो सुरु करणे संदर्भात आवाज उठवला होता. नवी मुबंई (जितेंद्र नटे) अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेतली पण तिथले अधिकारी आतमध्ये घुसून देत नव्हते. कारण त्यांना उशीर का होतेय हे विचारल्यावर उत्तर नव्हते. मोठे उदघाटन होणार मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्यामुळे उदघाट्न लांबले. शेवटी अधिकारी सुद्धा वैतागले. पब्लिकचा दबाव, पत्रकार लोकांचा दबाव, अनेक सामाजिक संघटनाचा दबाव आल्यामुळे शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देत मेट्रो सुरु करायला सांगितले आहे. आज शुक्रवार 17 नोव्हेंबरपासून दुपारी 3 वाजता मेट्रो सुरू होणार आहे. रात्री 10 वाजता शेवटची फेरी असणार. तर, शनिवारी, 18 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. मेट्रो 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. चला तर 13 वर्षांनी का होईन सुरु होतेय मेट्रो.... अनेक वर्षे बाहेरून काम बघत होते लोक अगदी मीं सुद्धा आज प्रत्यक्ष स्वप्न पूर्ण होणार. सर्वांना हार्दीक शुभेच्या. आमदार तसेच अनेक मंत्री, सरक