Posts

Showing posts from November 10, 2023

ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांची आज आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांच्या रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेशदादा धर्माधिकारी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे आदी उपस्थित होते.

Image
 ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांची आज आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांच्या रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेशदादा धर्माधिकारी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे आदी उपस्थित होते. 

शनिवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'

Image
शनिवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या 'दिवाळी पहाट' चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.                 दरवर्षी संगीत रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा दिवाळी पहाटचे ७ वे वर्ष असून या दिवाळी पहाट मध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायिका सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिकेसाठी अभिषेक पटवर्धन ९०२९५८०३४३, रोहित जगताप ८६९१९३०७०९, अभिषेक भोपी ९८२०७०२०४३ किंवा अक्षय सिंग ९८२०८३८८५१ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 

शे.का.प. आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने नागरिकांची दिवाळी झाली गोड, प्रितम म्हात्रे अनेक वर्ष राबवत आहेत सामाजिक उपक्रम

Image
  शे.का.प. आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने नागरिकांची दिवाळी झाली गोड, प्रितम म्हात्रे अनेक वर्ष राबवत आहेत सामाजिक उपक्रम " पनवेल : महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकीतून काही देणे लागतो या भावनेतून जे.एम.म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी फराळासाठी आवश्यक रवा, साखर, मैदा या वस्तू जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम गेली अनेक वर्ष हाती घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना एकाच्या पगारावर घर कसे चालवायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच दिवाळी हा सण तोंडावर आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा म्हणून व दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा या उद्देशाने प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेने दरवर्षीप्रमाणेच शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था "ना नफा ना तोटा " तत्वावर विक्री केंद्र उभारून नागरिकांना माफक दरात रवा, मैदा, साखर उपलब्ध करून देत आहेत.         शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडणाऱ्