निकम परमार हॉस्पिटल ने चांगली सेवा द्यावी : डॉ गिरीश गुणे डॉ अनिल परमार हे यशस्वी गव्हर्नर : डॉ गिरीश गुणे पनवेल / प्रतिनिधी
निकम परमार हॉस्पिटल ने चांगली सेवा द्यावी : डॉ गिरीश गुणे डॉ अनिल परमार हे यशस्वी गव्हर्नर : डॉ गिरीश गुणे पनवेल / प्रतिनिधी पंचवीस वर्षांपूर्वी पनवेल सारख्या गावात अद्ययावत आय सी यू हॉस्पिटलडॉ निकम डॉ अनिल परमार या दोन डॉक्टरांनी केली अतिशय चांगली सेवा या पंचवीस वर्षात डॉ निकम आणि डॉ अनिल परमार यांनी आजपर्यंत दिली पुढे हि अशीच रुग्ण सेवा द्यावी असे प्रतिपादन पनवेल चे लोकप्रिय डॉ गिरीश गुणे यांनी निकम परमार हॉस्पिटल च्या पंचविसाव्या वर्धापन दिनी आयोजित संजीवनी हेल्थ कार्ड च्या उदघाटन प्रसंगी केले . पनवेल मधील डॉ अनिल परमार आणि डॉ निकम यांनी पनवेल मध्ये पंचवीस वर्षांपूर्वी निकम परमार नावाने हॉस्पिटल सुरु केले , पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त निकम परमार हॉस्पिटल व डॉ रणजित माळी यांच्या संकल्पनेतून संजीवनी हेल्थ कार्ड चे उदघाटन डॉ गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना डॉ गुणे म्हणाले कि हॉस्पिटल ने आत्तापर्यंत चांगली सेवा दिली आहे आज संजीवनी हेल्थ कार्ड चे उदघाटन झाले आहे हे कार्ड जे जे रुग्ण नोंदणी करतील त्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार हॉस्पिटल करणार आहे