Posts

Showing posts from November 6, 2023

कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.... # एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे. # वातावरण चिघळणार - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचेही मत आहे. # आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Image
# कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.... # एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे. # वातावरण चिघळणार - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचेही मत आहे. # आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  रायगड मत / नागपूर रायगड चे खासदार आणि अजित पवार यांचे राईट हॅन्ड सुनील तटकरे रविवारी नागपूरमध्ये होते. पक्षाच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुप्रिया सुळे माझ्यावर गेल्या काही दिवसांत सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका करत आहेत. ‘एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे.        सुप्रिया सुळे माझा महासंस

पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती

Image
पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती  पनवेल (संजय कदम): पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करणे कामे वाहन चालकांना थांबवून नियम पाळणे जसे हेल्मेट वापरणे, सिट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. हा उपक्रम पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.         दरवर्षी भारतात सुमारे 1.70 लाख अपघाती मृत्यू होतात. जगाच्या एकूण अपघाती मृत्यू पैकी 11% मृत्यू भारतात होतात तर जगाच्या एकूण वाहन संख्येपैकी केवळ दीड टक्के वाहने भारतात आहेत यावरून आपले असे लक्षात येते की आपल्या वाहन वापराच्या तुलनेने अपघाती मृत्यू जास्त आहेत सदर वेळीजनतेने पोलिसंच्या कारवाईच्या भीतीने किंवा दंडाच्या भीतीने नियम न पाळता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नियम पालने गरजेचे आहे असे सांगितले सदर वेळी हेल्मेट वापरणे , सिट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे 0 डिंक अँड ड्राईव्ह न करणे, वाहन चालविते व

खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत किरकोळ दुखापत अपघात

Image
खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत  किरकोळ दुखापत अपघात       अपघात ठिकाण व वेळ-: आज दि.05/11/2023 रोजी  रात्री 02.25 वा.चे सुमारास मुंबई- पुणे  द्रुतगती महामार्गावर  पुणे लेनवर  कि.मी 03 येथे  खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत  किरकोळ दुखापत अपघातात घडलेला आहे.         * किरकोळ दुखापत  अपघात* *अपघातातील वाहन * 1)  कार क्रमांक MH 04 DY 1238 2)  आईसर टेम्पो क्रमांक  MH 14             HG 1379 अपघातचे कारण-*:- ता.म वेळी व जागी यातील कार क्रमांक MH 04 DY 1238 यावरील चालक नामे  धैर्य गाडा वय 21 वर्ष राहणार  मुंबई असे त्यांचे ताब्यातील कार घेऊन मुंबई पुणे द्रुतगती  महामार्गावरून पुणे बाजूकडे  चालवीत घेऊन जात असताना  किमी 03 या ठिकाणी आले असता त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून  शोल्डर लेनवर थांबून असलेल्या  आईसर टेम्पो क्रमांक  MH 14  HG 1379 यास पाठीमागून ठोकर मारून अपघात केला. सदर अपघातामध्ये कार चालकाच्या बाजूस बसलेले वरून पटेल वय 21 वर्षे राहणार मुंबई. यांच्या डोक्याला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांना आय आर बी एम्बुलेंस ने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दवा उपचार करता नेले आहे. अपघातग्रस्त  वाहन