शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल (प्रतिनिधी) विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार पुरुषोत्तम भोईर याने जमिनींच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुक संदर्भात कलम ४२० आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुरुषोत्तम भोईर वर जमिनीच्या व्यवहारातून गुन्हे दाखल असून व्यवहारातून लोकांची फसवणूक करण्याचा नित्यपाठ असलेल्या पुरुषोत्तम भोईर याने आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. सुदाम इंगळे यांनी दिनेश शंभुराम उर्फ शंभुलाल मांगे यांच्याकडून पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथील बिनशेती जमीन खरेदी केली होती. व त्यानुसार झालेल्या व्यवहाराप्रमाणे ७१ लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये रोख व बँक ट्रान्सफरद्वारे अदा करण्यात आली तर उर्वरित रक्कम भूखंडाची सरकारी मोजणी केल्यानंतर व हद्दी निश्चि