Posts

Showing posts from October 30, 2023

सेंट जोसेफ सिबीएससी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर# विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

Image
मोठ्या शाळेचे पोकळ वासे सेंट जोसेफ सिबीएससी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर भाजपा अल्पसंख्यांक सेल चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केली शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार पनवेल रायगड मत  मोठ्या घराचे पोकळ वासे अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे.तोच प्रत्यय मोठे नाव असणाऱ्या खासगी शाळेच्या बाबतीत येत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. रायन इंटरनॅशनल संचलित सेंट जोसेफ सिबीएससी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज चा थक्क करणारा भोंगळ कारभार एका अपघाताच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सानिया अकबर सय्यद या १२वी सायन्सच्या विद्यार्थिनीला गंभीर स्वरूपाची जखम झाल्यानंतर तिच्या पालकांना शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आल्याने या शिक्षण संस्थेच्या क्रियाशीलते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. याबाबत सविस्तर हाकिकत अशी की नुकतीच या शाळेतील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सानिया अकबर सय्यद विद्यार्थिनीला शारीरिक शिक्षण प्रकाराचा फारसा अनुभव नसलेल्या एका शिक्षिकेने चक्क फरशीवर रनिंग करण्यास भाग पाडले. सदर विद्यार्थिनीच्या अस्थमा ( दमा) या व्याधीची तिच्या पालकांनी मुख्याध्यापकांना व संबंधित श

# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा # स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे

Image
# पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेची तारीख जाहीर; 20 जिल्ह्यात 11 सत्रात होणार परीक्षा # स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे  पनवेल: पनवेल महापालिकेच्यावतीने 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8,9, 10,11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवरती महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.टीसीएस मार्फत हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा