# आज पंतप्रधान साईबाबांच्या चरणी होणार लीन, करणार अनेक योजनांचे उदघाटन # फोडणार लोकसभाचे नारळ, प्रचाराला सुरुवात... # नवी मुंबई चे उदघाटन कधी करणार? जनता आणि अधिकारी वैतागले. # ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार # कोकणात विकास कधी करणार? रायगड मत : raigadmat.page
# आज पंतप्रधान साईबाबांच्या चरणी होणार लीन, करणार अनेक योजनांचे उदघाटन # फोडणार लोकसभाचे नारळ, प्रचाराला सुरुवात... # नवी मुंबई चे उदघाटन कधी करणार? जनता आणि अधिकारी वैतागले. # ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार # कोकणात विकास कधी करणार? रायगड मत : raigadmat.page मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची उद्घाटने आणि भेटीगाठींना वेग येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन; तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत लाभ दण्यात येणार आहे. त्याचबरोबर निळवंडे धरणाचे जलपूजन करून ते कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास मोदी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. साईबाबांच्या समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन