Posts

Showing posts from October 25, 2023

केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वाचन प्रेरणा दिना निमीत्त स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने सफलतेचे रहस्य" या पुस्तकाचे केले समुह वाचन वाचनालयाने पुस्तके दिली शाळेला भेट

Image
केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वाचन प्रेरणा दिना निमीत्त स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने  सफलतेचे रहस्य" या पुस्तकाचे केले समुह वाचन वाचनालयाने पुस्तके दिली शाळेला भेट  (म्हसळा प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या  जयती निमीत्त वाचन प्रेरणा दिनाचे दिवशी म्हसळा न्यू इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यानी स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने  सफलतेचे रहस्य '"या पुस्तकाचे केले सामुदायीक वाचन  यावेळी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वाचन प्रेरणा दिना निमीत्त स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने  सफलतेचे रहस्य या विषयी पुस्तके शाळेला भेट दिली हे शालेय विद्यार्थी आणि वाचन संस्कृती असे अतूट नाते आहे याची जाणीव करून दिल्याचे मत वाचनालयाचे संचालक सुनिल उमरोटकर यानी या वेळी मांडले. कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,सचिव अशोक काते, ए.आर. मेमन.न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचे शिक्षक डी. सी. आमले, शिक्षिका संगीता शिर्के ,तालुका कृषि अधिकारी राजेंद्र ढंगारे ,कल्पना शेळके , ग्रंथपाल उदय करडे .सायली चोगुले, प्राची मेंदडकर ,विदयार

कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची पारगाव ग्रामपंचायतीची मागणी

Image
कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची पारगाव ग्रामपंचायतीची मागणी पनवेल (संजय कदम): कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची मागणी पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच गट विकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे.        पारगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोल्ही हे गाव अंतरराष्ट्रीय विमानतळ सोडत असल्यामुळे त्याचे पुर्नवसन झाले आहे. सदरचे पुर्नवसन वडघर हद्दीतीन झाले असल्याने सदरचे कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून घोषित करावे व त्याची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह कोल्ही गावातील पंच कमिटी अमृत भोईर, नारायण भोईर, संतोष राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर, सुधीर नाईक, चंद्रकांत भोईर, संतोष शंकर नाईक, साहिल नाईक, हितेश नाईक, राजेश भोईर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना सुद्धा या मागणीचे निवेदन सुद्धा दिले होते. त

गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने डिलेव्हरी बॉय ला लुटणाऱ्या चोराला केले गजाआड

Image
*गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने डिलेव्हरी बॉय ला लुटणाऱ्या चोराला केले गजाआड पनवेल (संजय कदम): कामोठे सेक्टर ३६ येथे अमेझोनमध्ये डीलेवरी बॉयच्या गाडीसह १९ पार्सल एका अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोराला गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे.         कामोठे सेक्टर सेक्टर ३६, प्लॉट नं. २० शिवसंकल्प बिल्डींगचे गेटच्या बाहेरील बाजूस रविंद्र शिवराम शेटटी (वय ४४ वर्षे) या अमेझॉन डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. त्यावेळी अज्ञात चोरटयाने त्यांच्या गाडीसह १९ पार्सल चोरुन नेली. यामध्ये २८,९९९ रुपये कीमंतीचा वन प्लस नॉर्ड मोबाईल यासह इतर सामान ज्याची किंमत सुमारे ५० हजार ५३६ रुपये आहे यांचा समावेश होता. या चोरीच्या ग्नतेची तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वपोनी उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी, पोहवा अजित पाटील, पोहवा इंद्रजीत कानू, पोहवा रमेश शिंदे, पोना आदिनाथ फुंडे आणि पोशी विक्रांत माळी आदींच्या पथकाने पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदा

दिशा कल्च रल इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित नवदुर्गा पुरस्कार व जागर आई दुर्गेचा, जल्लोष रास दांडियाचा कार्यक्रम संपन्न्न

Image
दिशा कल्च रल इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित नवदुर्गा पुरस्कार व जागर आई दुर्गेचा, जल्लोष रास दांडियाचा कार्यक्रम संपन्न्न  खांदा कॉलोनी (पनवेल) दिशा कल्च रल इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित नवदुर्गा पुरस्कार व जागर आई दुर्गेचा, जल्लोष रास दांडियाचा कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनी येथील बेल्लेझा बॅंक्वेट हॉल येथे शनिवार दि.21 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर व मृदुला पुसाळकर, आर के ग्रुप चे डायरेक्टर राजेंद्र कोलकर सर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. रास दांडियाच्या जल्लोषात आई दुर्गेचादेखील जागर करण्यात आला.पनवेल मधील प्रसिद्ध 'विश्वास हीच परंपरा'ब्रीदवाक्य असणाऱ्या पटेल ज्वेलर्स कडून आलेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू ही देण्यात आली यावेळी पटेल ज्वेलर्स च्या जनरल मॅनेजर प्रतीक्षा डायेस ,ओरोस्माईल डेंटल क्लिनिक च्या डॉ शिल्पा भंडारवार व डॉ. अमित भंडारवार,देवकी मिडिया या नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट, ऍडव्हरटाईझ व आयटी सोल

मा. नगरसेवक राजू सोनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चाळीस वर्षे जुन्या मंदिराचे केले नूतनीकरण*

Image
मा. नगरसेवक राजू सोनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चाळीस वर्षे जुन्या मंदिराचे केले नूतनीकरण* पनवेल (वार्ताहर): पनवेल महापालिकेचे मा. नगसेवक राजू सोनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चाळीस वर्षे जुन्या मंदिराचे नूतनीकरण केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात येत आहे.        कोणतीही देणगी न घेता स्व खर्चाने नवनाथ नगर रेल्वे स्टेशन रोड येथील वाघरी समाज यांचे चाळीस वर्षांपूर्वी चे जुने दुर्गा माता मंदिरयामध्ये मा नगरसेवक राजू सोनी यांनी सर्व मंदिराचे नवीन काम करून दिले तसेच वर पत्र्याची नवीन शेड बनवून दिली नवीन टाइल्स बसवण्यात आल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे पनवेल शहरातील सर्व झोपडपट्टीवासियांनी तसेच सर्व महिला भगिनी व नागरिकांनी आभार मानले आहेत. राजू सोनी यांनी आत्तापर्यंत लक्ष्मी वसाहत येथील लक्ष्मी आई मंदिर, दुर्गा माता मंदिर व श्री मारुती मंदिर, इंदिरानगर येथील यल्लमा माता मंदिर, रेणुका माता मंदिर, नवनाथ नगर दुर्गा माता मंदिर ,असे पनवेल शहर व पनवेल तालुक्यातील बरीच मंदिरांसाठी देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगर झोपडपट्टी व जीर्ण चाळी स्थानिक रहिवासी संघटन

पनवेल पोलिसांची धाडसी कारवाई; नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून केले जेरबंद आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले पोलिसांचे कौतुक

Image
पनवेल पोलिसांची धाडसी कारवाई; नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून केले जेरबंद आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले पोलिसांचे कौतुक  पनवेल (प्रतिनिधी) अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्हयाची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलीसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. २३ ऑक्टोबर) अभिनंदन व कौतुक केले.          सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत भेटवस्तूच्या आमिषाने पनवेलमधील एका महिलेची तब्बल ०३ लाख २५ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन पद्धतीने नायजेरिन सायबर गुन्हेगारांकडून एक महिन्यापूर्वी आर्थिक फसवणूक झाली होती. त्या अनुषंगाने या गुन्ह्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्या संदर्भात योग्य तपास दिशा मिळण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. सायबर गुन्हेगार तांत्रिकदृष्ट्या अनेक आधुनिक उपकरणांची मदत घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना जेर